महायुतीला मोठा धक्का; विजय शिवतारेंनी केली मोठी घोषणा

Vijay Shivtare | लोकसभा निवडणुकांमुळे देशासह राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मात्र, राज्याचं लक्ष सध्या बारामतीकडं लागून आहे. बारामतीत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंविरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यानेही इथं आपली थेट उमेदवारी जाहीर केली आहे. माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती मतदासंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला आहे. ते सतत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आहेत. यामुळे महायुतीत तिढा निर्माण झाला आहे.

विजय शिवतारे अपक्ष लढणार

अजित पावर गट आता सत्तेत सामील झाला आहे. राज्यात सध्या भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट यांचं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्याच्या या भूमिकेमुळ एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं टेंशन वाढलं आहे. शिवतारे (Vijay Shivtare) निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित आहे.

त्यामुळे बारामतीच्या जागेवरुन काय निर्णय होणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यातच विजय शिवतारे यांनी आज (23 मार्च) माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेमधून बाहेर पडणार काय?, असा सवाल करण्यात आला असता शिवतारे यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

विजय शिवतारे शिवसेनेतून बाहेर पडणार?

“माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घनिष्ठ नातं आहे. दोन चार महिने त्यांची अडचण झाली आहे. मला लोकसभा निवडणूक लढायचीच आहे. महायुतीत आपल्याला जागा तर सुटणार नाही. त्यांना अडचण आहे म्हणून मी बाहेर पडतोय. 25 वर्षाची सोबत आहे ती असणार आहे. मी लोकसभेत विजयी होणार हे दैदिप्यमान यश असेल.”,असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.

तसंच मी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. महायुतीशी माझी चर्चा झाली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवायची माझी इच्छा आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि विजय शिवतारे अशी लढत होईल. असा निर्धारच विजय शिवतारे यांनी केला आहे. शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अपक्ष लढणार असल्याची घोषणा केल्यामुळे राजकारणात याचीच चर्चा होत आहे.

News Title : Vijay Shivtare will contest as an independent

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहलीचं पहिल्याच सामन्यात लज्जास्पद कृत्य, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

वाघ अजून म्हातारा झालेला नाही!, पहिल्याच सामन्यात धोनीनं केलेली कमाल व्हायरल

आरसीबीच्या नशिबी पुन्हा पराभव; विराटने मात्र 21 धावा करून रचला इतिहास

IPL 2024: कोहलीच्या संघाचं पुन्हा एकदा जुनंच रडगाणं, पहिल्या सामन्याचा आला निकाल

जीवनात ‘या’ गोष्टी केल्या तर यश तुमच्या पायाशी लोळेल