केजरीवालांच्या कार्यकर्त्यांनी उचललं मोठं पाऊल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Arvind Kejriwal Arrested | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक (Arvind Kejriwal Arrested) केली आहे. यामुळे देशातून संताप व्यक्त केला जात आहे. काल परवा ईडीने त्यांच्या घरी धाड टाकली आणि सायंकाळच्या सुमारास दोन तास त्यांच्या घरात तपास सुरू होता. त्यावेळी ईडीने त्यांना अटक करण्यात आली.

26 मार्चला पंतप्रधानांच्या घराला घेराव

मद्य विक्री प्रकरणाबाबत त्यांना अटक करण्यात आली. याआधी याप्रकरणामध्ये तब्बल नऊ वेळा त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. याचपार्श्वभूमीवर केजरीवाल यांना अटक (Arvind Kejriwal Arrested) करण्यात आली. यामुळे आता दिल्लीमध्ये कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजप विरोधी नेत्यांना हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. आपचे कार्यकर्ते 26 मार्चला पंतप्रधानांच्या घराला घेराव घालणार आहेत.

केजरीवाल यांना भेटून देत नसल्याने, आमदार, नेते, नगरसेवक पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. दरम्यान केजरीवाल यांच्या अटकेनंतर (Arvind Kejriwal Arrested) संताप व्यक्त केला जातोय. कार्यकर्ते नेत्यांनी पोलिसांना ताब्यात ठेवलं. या अटकेविरोधात आपचे पदाधिकारी, नेते, नगरसेवक एकत्र येतील. 23 मार्चला भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांचा शहिद दिवस आहे. यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा समावेश असल्याचं गोपाल रॉय यांनी सांगितलं आहे.

“होळी साजरी होणार नाही”

पंतप्रधानांविरोधात आणि भाजपविरोधात आपचे कार्यकर्ते आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय. भाजप दडपशाहीचा वापर करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. 24 मार्चला आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. 25 मार्चला होळी साजरी करण्यात येणार नाही.

आपच्या कार्यकर्त्यांनी विविध राज्यामध्ये आंदोलन केलं आहे. आप पक्ष आणि इतर संबंधीत इतर घटक लवकरच आंदोलन करणार आहेत.

“लोकसभा निवडणूक हायजॅक करण्याचा भाजपचा डाव”

“केजरीवाल यांना अटक (Arvind Kejriwal Arrested) करणे म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. लोकसभा निवडणूक हायजॅक करण्याचा भाजपचा डाव आहे. ईडी गेली दोन वर्षे अटक केलेल्या आपच्या नेत्यांविरोधात एकही पुरावा सादर करू शकली नाही”, असं पश्चिम बंगालचे प्रवक्ते अर्नब मैत्री म्हणाले आहेत.

 News Title – Arvind Kejriwal Arrested Against Aap Leaders Aggressive On BJP

महत्त्वाच्या बातम्या

विराट कोहलीचं पहिल्याच सामन्यात लज्जास्पद कृत्य, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल

वाघ अजून म्हातारा झालेला नाही!, पहिल्याच सामन्यात धोनीनं केलेली कमाल व्हायरल

आरसीबीच्या नशिबी पुन्हा पराभव; विराटने मात्र 21 धावा करून रचला इतिहास

IPL 2024: कोहलीच्या संघाचं पुन्हा एकदा जुनंच रडगाणं, पहिल्या सामन्याचा आला निकाल

जीवनात ‘या’ गोष्टी केल्या तर यश तुमच्या पायाशी लोळेल