श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे तगडा उमेदवार देणार; ‘या’ व्यक्तीचं नाव चर्चेत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kalyan Lok sabha | आगामी लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये नवनवीन घटना घडताना दिसत आहेत. बारामती लोकसभाप्रमाणेच आता कल्याण मतदारसंघामध्ये राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेमध्ये दोन गट झाल्याने कल्याण लोकसभा मतदारसंघातून (Kalyan Lok sabha) शिंदे गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे निवडणूक लढणार आहेत. मात्र त्यांच्याविरोधात ठाकरे गट कोणता उमेदवारी देणार याबाबत चर्चा आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये (Kalyan Lok sabha) श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांना उमेदवारी देण्याच्या चर्चा आहेत. केदार दिघे हे आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये केदार दिघे हे श्रीकांत शिंदे यांना भारी पडतील अशी चर्चा आहे.

एकनाथ शिंदे हे शिवसेना दिवंगत नेते आनंद दिघे यांना आदर्श आणि गुरू मानतात. आम्ही आनंद दिघे यांचे वैचारीक वारसदार असल्याचं एकनाथ शिंदे याआधी अनेकदा म्हणाले आहेत. केदार दिघे श्रीकांत शिंदे यांच्याविरोधामध्ये निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा असून त्यांना माध्यामांनी याबाबत विचारले त्यावर केदार दिघे यांनी उत्तर दिलं.

काय म्हणाले केदार दिघे?

माध्यमांनी केदार दिघे यांना कल्याण मतदारसंघातून निवडणुकीला उमेदवारी दिली जाण्याबाबत प्रश्न केला. त्यावर केदार दिघे म्हणाले, “मला कल्याण लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याबाबत चर्चा होती. माध्यमातून याबाबत माहिती समोर आली. मात्र माझी आणि पक्षप्रमखांसोबत अद्यापही कोणतीही बैठक आणि भेट झाली नाही,” असं केदार दिघे म्हणाले आहेत.

श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात संधी दिली तर विचार करणार?

श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात संधी दिली तर विचार करणार? असा प्रश्न माध्यमांनी केदार दिघे यांना केला होता. यावर केदार दिघे यांनी उत्तर दिलं आहे. दिघे म्हणाले की, “शिवसेनेमध्ये पहिल्यापासून परंपरा आहे की वरिष्ठाचा आदेश आला की त्याचं पालन करायाचं. जर मला वरिष्ठांनी आदेश दिला तर मी त्यांचं पालन करेल. ही निव़डणूक लढण्याची कोणाचीही हरकत नसेल. मला अद्यापही तसा निरोप आला नाही. तसा आदेश आला तर नक्कीच त्याचं पालन करेल”, असं केदार दिघे म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांचा मास्टरप्लान

आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे केदार दिघे यांना कल्याण मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधामध्ये आनंद दिघे यांना उमेदवारी दिल्यास कल्य़ाण मतदारसंघामध्ये दिघेंचं काम आणि जनसामान्यांप्रती निष्ठा आहे. म्हणून आता केदार दिघे यांना कल्य़ाणमधून उमेदवारी देण्यात येणार आहे, अशी चर्चा आहे.

News Title – Kalyan Lok Sabha Shrikant Shinde Vs Kedar Dighe Candidate?

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे गटाला खिंडार?, ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात जाण्याची शक्यता

रहाणे आणि रचीनचा अफलातून झेल, विराट बघतच राहिला; व्हिडीओ व्हायरल

प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे यांना मोठा सल्ला; म्हणाले…

भाजपला मोठा धक्का; ‘हा’ मित्र पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार

विराट कोहलीचं पहिल्याच सामन्यात लज्जास्पद कृत्य, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल