“तो छगन भुजबळ कुठं गेला?”, मनोज जरांगेंचा पुन्हा गंभीर इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आता पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आक्रमक झाले आहे. सध्या आचारसंहिता सुरू असल्याने शांततेनं सभा घेत असून उपस्थितांशी संवाद साधत आरक्षणाबाबत मार्गदर्शन करत आहेत. गेली अनेक दिवसांपासून मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये समावून घेण्यासाठी मनोज जरांगे प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत 57 लाख नोंदी मिळाल्या आहेत असा दावा त्यांनी केला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

“75 वर्षामध्ये आरक्षण दिसून आलं नाही. आरक्षण समजून घेतलं पाहिजे. राज्यामध्ये दोनशे वर्षांपासूनच्या नोंदी सापडत आहेत. तेच आपल्या आरक्षणामध्ये घुसले आहेत. घरोघरी नोंदी सापडत असल्याने मराठ्यांना फायदा होत आहे. इतरांच्या नादामध्ये आपल्या लेकरांना फाशी द्यायची वेळ आली आहे”, असं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पारनेरच्या सभेमध्ये बोलत होते.

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देणार असल्याची अंमलबजावणी सरकार करत होते. मात्र मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षण हवं असल्याची मागणी मनोज जरांगे आणि मराठा समाजाची आहे. राज्यामध्ये एकूण 57 लाख नोंदी मिळाल्याचा दावा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. मग या नोंदी सापडल्या कशा? कोणी लपवून ठेवल्या होत्या?, असा सवाल मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केला.

“…तर मराठा ही प्रगत जात असती”

“नोंदी मिळाल्या असत्या तर मराठा प्रगत जात असती. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा डाव होता. विधानसभेच्या पटलावर तुम्ही मराठा समाज हा मागास सांगता, मग 50 टक्क्यांच्या आत आणि ओबीसी समाजातील 27 टक्क्यांमधून आरक्षण का देत नाहीत?”, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

“जे नेते मोठे झाले आहेत आता तेच नेते मराठ्यांच्या विरोधामध्ये बोलत आहेत. जो नोंदीला विरोध करत होता आता त्यानेच नोंदी प्रमाणपत्र काढले आहे. आमच्याविरोधात जो कोणी बोलेल त्यांचा सुपडासाफ करत असतो. तो जामनेरचा बोलतोय लाड केले काय लाड केले? फडणवीस साहेबांना सहा महिन्यांपासून मी काही बोललो नाही, काय कराल जेलमध्ये टाकाल. मी जेलमध्ये जाईल तिथंही आंदोलन करेल आणि कैद्यांना आरक्षण समजून सांगेल”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

 मनोज जरांगे आक्रमक, भुजबळांना सुट्टी नाही

त्यानंतर मनोज जरांगे यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरही हल्ला केला आहे. “तो (छगन भुजबळ) कुठं गेला? हिमालायात गेला काय? मराठ्यांबद्दल बोलला तर सुट्टी नाही”, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली.

News title – Manoj Jarange Patil ON Shinde Government And Chhagan Bhujbal About Maratha reservation

महत्त्वाच्या बातम्या

नागरिकांनो या योजनेत फक्त 3000 रुपये गुंतवा आणि महिन्याला लाखो रुपये मिळवा

पुणेकरांसाठी धोक्याची घंटा!; धक्कादायक माहिती समोर

होलिकेच्या अग्नीपासून समजतो वर्षाचा शुभ आणि अशुभ अंदाज; पाहा यंदाचं वर्ष तुमच्यासाठी कस

पुण्यात फोटो भाजपच्या गिरीश बापटांचा, फायदा मात्र काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना?

हवामान विभागाचा मोठा इशारा; ‘या’ भागांत अवकाळी पावसाची शक्यता