Weather Update | मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच राज्यात तापमानामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. आता दिवसा घराबाहेर पडणं देखील अवघड झालं आहे. काही ठिकाणी तर घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
याउलट राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार धारा बरसत आहेत. मागच्या आठवड्यात विदर्भामध्ये भर उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावली होती. तसंच देशातही काही ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. मध्य प्रदेशपासून पश्चिम बंगालपर्यंतच्या भागात पावसाने हजेरी लावली आहे.
देशातील ‘या’ भागांत पावसाची शक्यता
याशिवाय जम्मू-काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश (Weather Update ) आणि उत्तराखंड येथेही पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. काही भागांमध्ये बर्फवृष्टीही होऊ शकते. आता हवामान विभागाने या भागांमध्ये पुन्हा 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
अगोदरच पाऊस पडून गेल्याने शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यात अजून पाऊस पडणार म्हटल्यावर शेतकऱ्यांचं टेंशन वाढलं आहे. पावसाच्या वातावरणानंतर विदर्भातील काही भागांमध्ये कमाल तापमानात घट झाली आहे. तर, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा 38 अंशांवर पोहोचला आहे.
राज्यातील तापमानाचा पारा आणखी वाढणार
विदर्भाकडील (Weather Update ) गोंदिया, गडचिरोली या भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली होती. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेल्या विदर्भातील वातावरणातही दोन दिवसांपासून बदल होताना दिसत आहे. पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानात घट झाली होती. मात्र सध्या पाऊस थांबला आहे. यामुळे तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. विदर्भात आज तापमान 36 ते 37 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 27 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागात उन्हाचे चटके जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
News Title : Weather Update in india
महत्त्वाच्या बातम्या-
KKR समोर हैदराबाद देणार आव्हान; जाणून घ्या दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11
BMW कंपनीने लाँच केली जबरदस्त फीचर्ससह कार; किंमत ऐकून व्हाल थक्क
“यातच आपली कुवत कळते, फुकटचे सल्ले…”, किरण मानेंच्या टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर
तब्बल 14 महिन्यांनी हा खेळाडू मैदान गाजवण्यास सज्ज! आज रंगणार PBKS vs DC
शिंदे गटाला खिंडार?, ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात जाण्याची शक्यता