पुण्यात फोटो भाजपच्या गिरीश बापटांचा, फायदा मात्र काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News: लोकसभा निवडणुकीचं (Pune Loksabha 2024) वातावरण चांगलंच तापलं आहे. पुण्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये खरी लढत होणार आहे. भाजपने या ठिकाणी माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना तिकीट दिलं आहे तर काँग्रेसनं कसबा पॅटर्न चालवणाऱ्या आमदार रविंद्र धंगेकरांच्या (Ravindra Dhangekar) खांद्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी टाकली आहे. दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत, त्यामुळे पुण्याच्या लढतीकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

पुण्यात झळकलेल्या पोस्टर्सची चर्चा-

पुण्यात नुकतेच माजी खासदार गिरीश बापट (Girish Bapat) आणि काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांचा फोटो असलेले पोस्टर्स (Ravindra Dhangekar and Girish Bapat Poster) झळकले. डिजीटल मीडियावर मोठ्या प्रमाणात हे पोस्टर्स व्हायरल झालेले पहायला मिळाले. जो कसब्याचा आमदार, तोच पुण्याचा खासदार… असं या पोस्टर्सवर लिहिलेलं होतं. या पोस्टर्सवरुन मोठा राडा झाला आहे, मात्र त्याआधी हे पोस्टर्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सर्क्युलेट झाले आहेत.

Use of Girish Bapat photograph
हेच ते पोस्टर ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे

भाजपने घेतला पोस्टर्सवर आक्षेप-

अशाप्रकारे पोस्टर्स व्हायरल झाल्यानंतर (Pune News) भाजप टेंन्शनमध्ये आल्याचं चित्र आहे. पुण्याची ताकद, गिरीश बापट(Punyachi Takad, Girish Bapat) नावाने ओळख असलेले गिरीश बापट सध्या आपल्यात नाहीत, मात्र त्यांच्या मागे त्यांना मानणारा मोठा वर्ग कसब्यात आहे. काँग्रेसचा आमदार अशाप्रकारे बापट यांचा फोटो वापरुन त्यांची मतं ओढण्याचा प्रयत्न करत असेल तर भाजपसाठी ही सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे, त्यामुळे भाजप या गोष्टीवर तात्काळ अॅक्शन मोडवर आलेली पहायला मिळाली.

गिरीश बापट यांचा मुलगा गौरव बापट (Gaurav Bapat) यांनी या प्रकरणी मीडियासमोर येत आपलं म्हणणं मांडलं आहे. हा प्रकार चुकीचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस उमेदवाराला स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास नसल्याने ते बापट साहेबांना फोटो वापरत आहेत, अशी टीका गौरव बापट यांनी केली आहे. दुसरीकडे भाजपचे खासदारकीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी देखील या प्रकाराला विरोध केला आहे.

भाजपचा विरोध मात्र काँग्रेसला फायदा-

काँग्रेस (Pune Congress) उमेदवारांनं गिरीश बापट यांचा फोटो वापरण्याला भाजप विरोध करताना दिसत आहे, कारण त्यांना माहीत आहे की अशा प्रकारे प्रचार झाला तर त्याचा सर्वात मोठा फटका भाजप उमेदवाराला बसू शकतो. त्याला काही कारणं सुद्धा आहेत.

BJP MP Girish Bapat

सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे गिरीश बापट यांना मानणारा वर्ग- गिरीश बापट यांना मानणारा वर्ग हा कसब्यात (Kasba Peth, Pune) मोठ्या प्रमाणावर आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत यातील बहुतांश जणांनी एकतर मतदान केलं नाही किंवा रविंद्र धंगेकर यांना मतदान करणं पसंत केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही मतं रविंद्र धंगेकरांच्या खात्यात जाऊ शकतात.

बापट आणि धंगेकर दोन्ही कसब्यातून- गिरीश बापट आणि रविंद्र धंगेकर दोघेही कसबा भागातून येतात, त्यामुळे गिरीश बापट यांच्यानंतर आपला माणूस म्हणून कुणाकडे पाहिलं जात असेल तर ते नाव म्हणजे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar, MLA Kasba Peth, Pune) यांंचं आहे. त्यामुळे या गोष्टीवर मतदान झालं तर कसब्यात याचा फायदा नक्की धंगेकरांना होऊ शकतो.

सर्वसामान्यांचा नेता म्हणून परिचय- कसब्यात (Kasba Vidhansabha) रविंद्र धंगेकर यांचा सर्वसामान्यांचा नेता म्हणून परिचय आहे. त्यांनी नगरसेवक असताना केलेली कामे, तसेच रात्री अपरात्री त्यांनी लोकांना केलेली मदत या साऱ्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत, त्यामुळे येथील मतदार बापट यांच्यानंतर थेट धंगेकरांच्या पाठिशी उभा राहू शकतो.

धंगेकर कसब्याचे, मोहोळ कसब्याचे नाहीत- गिरीश बापट यांच्यानंतर तेवढ्याच ताकदीचा नेता कसब्यातून तयार झाला असेल तर ते रविंद्र धंगेकरच आहेत. दुसरीकडे भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा तसा कसब्याशी काही संबंध नाही. त्यामुळे कसबा या गोष्टीवर मतदान फिरलं तर ते फक्त रविंद्र धंगेकर यांच्या पथ्यावर पडू शकतं.

Aba Bagul displeasure over the nomination of Ravindra Dhangekar

कसबा पॅटर्नची पुनरावृत्ती होणार?

सध्या पुण्यात फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे कसबा पॅटर्नची पुनरावृत्ती पुण्यात होणार का?. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव केला. कसबा भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता, त्याच भाजपसोबत एकनाथ शिंदेंची शिवसेना सुद्धा होती. अशा परिस्थितीत धंगेकरांनी या ठिकाणावरुन विजयश्री खेचून आणली.

रविंद्र धंगेकर यांच्या कसबा पोटनिवडणुकीतील विजयानं काँग्रेसला पुण्यात पुन्हा संजिवनी मिळाली आहे. धंगेकरांचा हा विजय कसबा पॅटर्न (Kasba Pattern, Pune) म्हणून ओळखला जात आहे. या विजयानं धंगेकरांचं नाव राज्य तसेच देश पातळीवर पोहोचलं आहे, त्यामुळे आता येत्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा पुण्यात कसबा पॅटर्नची पुनरावृत्ती होणार का?, असा सवाल विचारला जात आहे.

NewsTitle: pune loksabha 2024 ravindra dhangekar vs murlidhar mohol

महत्त्वाच्या बातम्या-

शनिवारच्या दिवशी चुकूनही ‘या’ 5 गोष्टी करू नका अन्यथा…

श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे तगडा उमेदवार देणार; ‘या’ व्यक्तीचं नाव चर्चेत

केजरीवालांच्या कार्यकर्त्यांनी उचललं मोठं पाऊल!

महायुतीला मोठा धक्का; विजय शिवतारेंनी केली मोठी घोषणा

‘तिहारचा बॉस, मी तुमचं तुरुंगात स्वागत करतो’; सुकेश चंद्रशेखरचा पत्रातून केजरीवालांना टोमणा