पुणेकरांसाठी धोक्याची घंटा!; धक्कादायक माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | पुण्याबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ज्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील भूपृष्ठभागवरील तापमानावर आधोरित केलेल्या अभ्यासातून पुण्यातील भूपृष्ठभागाचे तापमान सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यात तब्बल सरासरी 49.04 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहेत. त्यात वाढलेली उष्णता शहरातील तापमानातही भर घालत असल्याने अजून चिंता वाढली आहे. संशोधकांनी दिल्ली, जयपूर, कोलकाता आणि पुण्यातील भूपृष्ठभागवरील तापमानाचा अभ्यास केला असता, हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

पुण्याबाबत धक्कादायक अहवाल समोर

सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट या राष्ट्रीय संस्थेने या महिन्यात हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात ‘भारताची पर्यावरणीय सद्यस्थिती 2024’ हा संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यासाठी दिल्ली, कोलकाता, जयपूर आणि पुणे या चार शहरांची निवड करण्यात आली होती.

या अहवालामध्ये (Pune News) सर्वाधिक तापमान दिल्लीमध्ये 48.77 नोंदवण्यात आले. तर जयपूरमध्ये 47.63 आणि कोलकतामध्ये 41.99 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिल्ली आणि राजस्थानमध्ये उन्हाळ्याच्या ऋतुमध्ये तापमानाचा पारा 45 पर्यंत जात असतो. आता पुण्यातील जमिनीपासून चार फूट अंतरापर्यंतचे तापमान म्हणजेच भूपृष्ठभागावरील तापमानात सर्वाधिक नोंद झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

‘या’ कारणांमुळे पुण्याच्या तापमानात वाढ

पुण्यात काँक्रिटीकरण अधिक झाल्याने ही स्थिति निर्माण झाली आहे. शहरात 25 टक्के वृक्षाच्छादन असावं असा जागतिक आरोग्य संघटेनेचा निकष आहे. मात्र, पुण्यात याचं प्रमाण फक्त 1.4 चौरस मीटर इतकं आहे. त्यातच काँक्रिटच्या रस्त्यांमधून पावसाचे पाणी जमिनीत मुरतच नाही. यामुळे उष्णता शोषली जाते.

यासोबतच काचेच्या इमारती, तेथील वातानुकुलीत यंत्रणाही (Pune News) याला कारणीभूत आहेत. तापमान जास्त असल्याने रात्रीही उष्णतेच्या झळा बसतात. पुण्यात येरवडा, लोहगाव, नगर रस्ता परिसर, विमाननगर, हडपसर, वडगाव शेरी, बाणेर-बावधन, हडपसर, कात्रज, कोंढवा ही ठिकाणे सर्वाधिक तापमान असलेले भाग आहेत.

News Title : Pune News Land Surface Temperature In Pune At 49.04 Degrees Celsius

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरे तगडा उमेदवार देणार; ‘या’ व्यक्तीचं नाव चर्चेत

केजरीवालांच्या कार्यकर्त्यांनी उचललं मोठं पाऊल!

महायुतीला मोठा धक्का; विजय शिवतारेंनी केली मोठी घोषणा

‘तिहारचा बॉस, मी तुमचं तुरुंगात स्वागत करतो’; सुकेश चंद्रशेखरचा पत्रातून केजरीवालांना टोमणा

KKR समोर हैदराबाद देणार आव्हान; जाणून घ्या दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग 11