प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; महाविकास आघाडीत खळबळ

मुंबई | उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी मोठी घोषणा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. यामुळे  महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली आहे. आंबेडकर यांच्या या निर्णयाने महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

महाविकास आघाडीचं भिजत घोंगडं आहे. त्यांच्या जागा वाटपाचा तिढा असूनही सुटलेला नाही. त्यामुळे आम्ही येत्या 26 मार्च रोजी आमची भूमिका जाहीर करू, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

वस्तुस्थिती दाखवली जात नाही. त्यांचं झाकलेले कोंबडं आता बांग देऊ लागलं आहे. त्यांचेच भांडण संपत नाहीये. त्यांचाच तिढा सुटत नाहीये. मग आम्ही एन्ट्री करून काय करायचं? आम्ही 26 तारखेपर्यंत थांबणार आहोत, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

महाविकास आघाडीला तीन दिवसांचा अल्टिमेटम

प्रकाश आंबेडकर यांनी एक प्रकारे महाविकास आघाडीला तीन दिवसांचा अल्टिमेटमच दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा या तीन दिवसात सुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आम्ही काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे दिल्लीतले नेते रमेश चेन्नीथला यांना पत्र लिहिलं आहे. तर राज्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे आम्ही अशी आशा करतोय की, काँग्रेसचं महाराष्ट्रातील कोणत्या सात जागांवर एकमत झालं तर चांगलं आहे. नाही झालं तर खर्गेंनी येऊन आम्हाला कळवावं, असं आम्ही त्यांना सांगितलं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

महाविकास आघाडीचं विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा. कारण आम्हाला त्याबाबत माहिती नाही. दुसरं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवा पक्षा रजिस्टर केलाय. त्यांनी एक लिस्ट आमच्याकडे सादर केलीय. तेव्हा त्यांना आम्ही सांगितलंय की, आमचंच घोंगड भिजत पडलेलं आहे. ते मिटल्याशिवाय आम्ही आपल्याशी बोलू शकत नाही , असंही प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“तो छगन भुजबळ कुठं गेला?”, मनोज जरांगेंचा पुन्हा गंभीर इशारा

“तुम्हाला बारामतीत…”; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

‘या’ योजनेत फक्त 3000 रुपये गुंतवा आणि महिन्याला लाखो रुपये मिळवा

पुणेकरांसाठी धोक्याची घंटा!; धक्कादायक माहिती समोर

होलिकेच्या अग्नीपासून समजतो वर्षाचा शुभ आणि अशुभ अंदाज; पाहा यंदाचं वर्ष तुमच्यासाठी कस