‘आढळरावांना 2019 सालचा बदलाच घ्यायचा असेल तर…’; अमोल कोल्हे थेट बोलले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shirur Lok Sabha Election 2024 | बारामती मतदारसंघानंतर पवार कुटुंबीयांसाठी दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ.  शिवसेना-भाजप युतीच्या काळात शिरूर मतदारसंघ शिवसेनेकडं होता. शिवाजीराव आढळराव पाटील हे तीन वेळा इथून निवडून आले होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळरावांना पराभवाची धूळ चारली. त्यानंतरही ते मतदारसंघात सक्रिय राहिले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अमोल कोल्हे हे आपल्याकडं येतील असा अजित पवारांचा विचार होता. मात्र कोल्हे हे शरद पवारांशी निष्ठावंत राहिले. त्यामुळे अजित पवारांनी त्यांना पराभूत करण्याचा निर्धारच केला आहे. त्यामुळे इथल्या लढतीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुन्हा कोल्हे विरूद्ध आढळराव?

अजित पवारांनी हा मतदारसंघ मिळवला खरा, पण कोल्हे यांच्या विरोधात त्यांच्याकडं तगडा उमेदवार नव्हता. त्यामुळं शिवाजारीव आढळराव पाटलांनाच राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. लवकरच आढळराव राष्ट्रवादीच प्रवेश करणार आहे. अशात यावर अमोल कोल्हे कोल्हेंनी भाष्य केलं आहे.

“आढळराव बदला घेण्यासाठी लढतायेत”

गेल्या वेळचा बदला घेण्यासाठीच आपण निवडणुकीला उभे राहणार असून यावेळी निवडून येणार याची 100 टक्के खात्री आहे. ही निवडणूक हे सर्व रेकॉर्ड तोडणारी असेल, असं अमोल कोल्हेंनी म्हटलंय.

2019 सालचा बदला घेण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढणार असतील तर एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने लोकसभेत जाऊच नये का? का फक्त परदेशात कंपन्या असणाऱ्यांच्याच माणसाला लोकसभेत जाण्याचा अधिकार आहे?, असा सवाल खासदार अमोल कोल्हेंनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज हा दिल्लीत घुमत राहावा यासाठी मायबाप जनतेकडे मी आशिर्वाद मागतोय. त्यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे. त्यांना जर बदला वाटत असेल तर मायबाप जनता सुज्ञ आहे, असंही अमोल कोल्हे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

बायकोसोबत ‘असं’ वागत असाल तर आताच थांबा; होईल मोठं नुकसान!

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; महाविकास आघाडीत खळबळ

“तो छगन भुजबळ कुठं गेला?”, मनोज जरांगेंचा पुन्हा गंभीर इशारा

“तुम्हाला बारामतीत…”; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

‘या’ योजनेत फक्त 3000 रुपये गुंतवा आणि महिन्याला लाखो रुपये मिळवा