‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेची सर्वात मोठी घोषणा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Abhijeet Bichukale | आगामी लोकसभा निवडणुकीवर मनोरंजन क्षेत्रातील बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेनं (Abhijeet Bichukale) मोठं वक्तव्य केलं आहे. अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) नेहमी आपल्या वक्तव्यासाठी चर्चेत असतो. त्यानं केलेल्या वक्तव्याने विनोदनिर्मिती होते. अशातच आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत बिचुकलेनं (Abhijeet Bichukale) एक वक्तव्य केलं आहे. त्याची सर्वत्र चर्चा  होतेय.

अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) कधी काय बोलेल याचा काही नेम नाही. सध्या राज्याचं वातावरण हे राजकीय आहे. आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आहे. अशातच अभिजीत बिचुकलेनं असं वक्तव्य केलं आहे त्यावर अनेकजण चर्चा करत आहेत. सातारा लोकसभेची निवडणूक मी लढणार असल्याचं अभिजीत बिचुकलेंनी म्हटलंय. या वक्तव्याने माध्यमांमध्ये चर्चा आहे.

काय म्हणाला अभिजीत बिचुकले?

“सातारा लोकसभा निवडणूक मी लढणार. अभिजीत बिचुकले सातारा लोकसभा निवडणूक लढणार आहे. उदयनराजे यांना दुसऱ्या पक्षामध्ये जायची काय गरज. त्यांना दिल्लीला जावं लागत आहे दुर्देवं आहे. ज्य़ा भाजपवाल्यांनी जय भवानी जय शिवाजीला विरोध केला त्या भाजपसोबत ते का गेले?”, असा सवाल आता अभिजीत बिचुकलेनं केला आहे. त्यानंतर महायुतीचा तिढा मी सोडवणार असा दावा अभिजीत बिचुकलेंनी केला आहे.

“अमित शहा गुजराती उद्योजक बाकीचे सगळे चाकर”

अभिजीत बिचुकले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील सोडलं नाही. बिचुकलेनं त्यांच्यावरही भाष्य केलं आहे. “अजित पवार यांना केवळ 2 ते 3 जागा मिळतील. अमित शहा हे गुजराती उद्योजक आहेत. इतर सर्व त्यांचे चाकर आहेत,” असं अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.

“उदयनराजे माझे बंधू”

अभिजीत बिचुकले यांनी भाजप नेते उदयनराजे यांच्यावर भाष्य केलं आहे. “उदयनराजे माझे बंधू आहेत, होते आणि राहणार. मी अनेक निवडणुका लढल्या आहेत. पण आम्ही आजही चांगले मित्र आहोत. छत्रपती हे छत्रपती आहेत ते इकडं तिकडं फिरत आहेत ते मला पटत नाही”, असं अभिजीत बिचुकले म्हणाले.

याआधी वरळी मतदारसंघातून अभिजीत बिचुकलेंनी आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवली होती. तसेच त्यांनी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात सातारा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसेच पुण्यातून कसबा पोटनिवडणूकही लढवली होती.

News Title – Abhijeet Bichukale Big Statement About Assembly Election

महत्त्वाच्या बातम्या

बायकोसोबत ‘असं’ वागत असाल तर आताच थांबा; होईल मोठं नुकसान!

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; महाविकास आघाडीत खळबळ

“तो छगन भुजबळ कुठं गेला?”, मनोज जरांगेंचा पुन्हा गंभीर इशारा

“तुम्हाला बारामतीत…”; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

‘या’ योजनेत फक्त 3000 रुपये गुंतवा आणि महिन्याला लाखो रुपये मिळवा