“उदयनराजे इकडे तिकडे फिरताहेत…”; बिचुकलेचं मोठं वक्तव्य

Abhijeet Bichukale | आगामी लोकसभा निवडणुकीवर मनोरंजन क्षेत्रातील बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेनं (Abhijeet Bichukale) मोठं वक्तव्य केलं आहे. अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) नेहमी आपल्या वक्तव्यासाठी चर्चेत असतो. त्यानं केलेल्या वक्तव्याने विनोदनिर्मिती होते. अशातच आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्यावर अभिजीत बिचुकलेनं (Abhijeet Bichukale) एक वक्तव्य केलं आहे. त्याची सर्वत्र चर्चा  होतेय.

सध्या राज्यामध्ये राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून घमासान सुरू आहे. यावर आता अभिजीत बिचुकलेनं वक्तव्य केलं आहे. “मी महायुतीची जागावाटप करून देतो, महायुतीच्या नेत्यांनी माझ्याकडं यावं,” असं वक्तव्य अभिजीत बिचुकले यांनं केलं आहे. त्यानंतर  उमेदवारीच्या यादीमध्ये उदयनराजे यांचं नाव न आल्यानं अभिजीत बिचुकलेनं उदयनराजेंबद्दलही भाष्य केलं आहे.

काय म्हणाला अभिजीत बिचुकले?

“सातारा लोकसभा निवडणूक मी लढणार. अभिजीत बिचुकले सातारा लोकसभा निवडणूक लढणार आहे. उदयनराजे यांना दुसऱ्या पक्षामध्ये जायची काय गरज. त्यांना दिल्लीला जावं लागत आहे दुर्देवं आहे. ज्य़ा भाजपवाल्यांनी जय भवानी जय शिवाजीला विरोध केला त्या भाजपसोबत ते का गेले?”, असा सवाल आता अभिजीत बिचुकलेनं केला आहे.

“उदयनराजे इकडं तिकडं फिरत आहेत ते मला पटत नाही”

“उदयनराजे माझे बंधू आहेत, होते आणि राहणार. मी अनेक निवडणुका लढल्या आहेत. पण आम्ही आजही चांगले मित्र आहोत. छत्रपती हे छत्रपती आहेत ते इकडं तिकडं फिरत आहेत ते मला पटत नाही”, असं अभिजीत बिचुकले म्हणाले.

अभिजीत बिचुकले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील सोडलं नाही. बिचुकलेनं त्यांच्यावरही भाष्य केलं आहे. “अजित पवार यांना केवळ 2 ते 3 जागा मिळतील. अमित शहा हे गुजराती उद्योजक आहेत. इतर सर्व त्यांचे चाकर आहेत,” असं अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.

राजे अपक्ष लढणार?

उदयनराजेचं भाजप उमेदवारांच्या यादीमध्ये नाव आलं नसल्यानं सातारा येथे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये उदयनराजेंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राजे अपक्ष लढणार असल्याच्या चर्चा देखील आहेत.

News Title – Abhijeet Bichukale Statement On Udayanraje Bhosale

महत्त्वाच्या बातम्या

‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेची सर्वात मोठी घोषणा!

‘आढळरावांना 2019 सालचा बदलाच घ्यायचा असेल तर…’; अमोल कोल्हे थेट बोलले

बायकोसोबत ‘असं’ वागत असाल तर आताच थांबा; होईल मोठं नुकसान!

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; महाविकास आघाडीत खळबळ

“तो छगन भुजबळ कुठं गेला?”, मनोज जरांगेंचा पुन्हा गंभीर इशारा