पराभवानंतर ऋषभ पंतने वाचला चुकांचा पाढा, सांगितलं पराभवाचं कारण

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PBKS vs DC | शिखर धवनच्या पंजाब किंग्स संघानं यंदाच्या आयपीएलची सुरुवात विजयानं केली आहे. कमबॅक करणाऱ्या ऋषभ पंतला पराभवाचा धक्का बसला आहे. सॅम करन आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पंजाबनं दिल्लीचा पराभव केला आहे.

पंजाबची विजयी सलामी

दिल्लीच्या गोलंदाजांनी सामन्यात बऱ्याचदा कमबॅक मिळवून दिलं होतं. पण मोक्याच्या क्षणी झेल सोडल्याने सामना गमवण्याची वेळ आली. पराभवानंतर ऋषभ पंतने चुकांचा पाढा वाचला. ऋषभने पराभवाचं कारण सांगितलं.

ऋषभने सांगितलं पराभवाचं कारण

आमची फलंदाजी हवी तशी झाली नाही. त्यामुळे अभिषेक पोरेलला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरावं लागलं. त्याने शेवटच्या षटकात ठोकलेल्या धावांमुळे सामन्यात रंगत आली. पण आमच्याकडे एक बॉलर शॉर्ट होता. असं असलं तरी आमच्या खेळाडूंनी वारंवार सामन्यात आणण्याचा चांगला प्रयत्न केला, असं ऋषभने सांगितलं.

पराभवासाठी कारण देणं चुकीचं ठरेल. एक बॉलर शॉर्ट असणं हे काही चांगलं नाही. पण विजयाचं श्रेय पंजाब किंग्सच्या खेळाडूंना द्यावं लागेल, असंही ऋषभ पंत पुढे म्हणाला.

दिल्लीनं प्रथम फलंदाजी करताना 174 धावांपर्यंत मजल मारली होती. हे आव्हान पंजाबनं अखेरच्या षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले. पंजाबसाठी सॅम करन यानं 63 धावांची शानदार खेळी केली. तर लिव्हिंगस्टोन यानं 21 चेंडूत नाबाद 38 धावांचं योगदान दिलं.

सॅम करन यानं पंजाबसाठी विजय खेचून आणला. त्याला लियाम लिव्हिंगस्टोन यानं चांगली साथ दिली. लिव्हिंगस्टोन यानं 21 चेंडूमध्ये नाबाद 38 धावांची खेळी केली. यामद्ये तीन षटकार आणि दोन चौकारांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“उदयनराजे इकडे तिकडे फिरताहेत…”; बिचुकलेचं मोठं वक्तव्य

‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेची सर्वात मोठी घोषणा!

‘आढळरावांना 2019 सालचा बदलाच घ्यायचा असेल तर…’; अमोल कोल्हे थेट बोलले

बायकोसोबत ‘असं’ वागत असाल तर आताच थांबा; होईल मोठं नुकसान!

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; महाविकास आघाडीत खळबळ