IPL 2024 | आयपीएल 2024 च्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएलच्या सतराव्या हंगामाचे अद्याप संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले नाही. (IPL 2024 News) देशात लोकसभा निवडणूक होत असल्याने केवळ पहिल्या टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक समोर आले आहे. (IPL Schedule) पण, यंदा आयपीएलचा अंतिम सामना एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे 26 मे रोजी खेळवला जाणार असल्याचे कळते. याच मैदानात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात सलामीचा सामना झाला.
गुजरातमधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्लालिफायर 1 आणि एलिमिनेटरचा सामना होईल. तर क्वालिफायर 2 चा थरार चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर रंगेल, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली. आयपीएलचे आतापर्यंत तीन सामने झाले असून आज रविवारी दोन लढती होत आहेत.
मुंबईत एकही सामना नाही
आयपीएलच्या ‘करा किंवा मरा’ अशा लढती अर्थात नॉक आउट सामन्यांचे ठिकाण आणि तारीख जाहीर झाली आहे. माहितीनुसार, अंतिम सामन्याशिवाय, चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर आयपीएल 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायरचे आयोजन केले जाणार आहे. मात्र, दुसऱ्या क्वालिफायरची तारीख अद्याप कळू शकलेली नाही.
दरम्यान, पीटीआयने बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, आयपीएल कार्यकारिणीने गेल्या वर्षीच्या गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जच्या घरच्या मैदानावर सुरुवातीचा सामना आणि अंतिम सामना आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्येही अशीच परंपरा होती, जी यावेळी देखील पाळली जात आहे.
IPL Qualifiers, Eliminator and Final venue (PTI):
The Final – Chepauk Stadium.
Qualifier 1 – Narendra Modi Stadium.
Eliminator – Narendra Modi Stadium.
Qualifier 2 – Chepauk Stadium. pic.twitter.com/eczzta5Uw5— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 23, 2024
IPL 2024 चा थरार
तसेच देशातील लोकसभा निवडणुका लक्षात घेता उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे, जे लवकरच जाहीर केले जाईल. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सलामीचा सामना धोनीच्या गडात अर्थात चेपॉक स्टेडियमवर खेळवला गेला.
सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नेहमीप्रमाणे आपला विजयरथ कायम ठेवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभवाची धूळ चारली. प्रथमच ऋतुराज गायकवाड सीएसकेच्या संघाचे नेतृत्व करत आहे. दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा उडवला. तर शनिवारी रात्री झालेला सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला, ज्यात कोलकाता नाईट रायडर्संने सनरायझर्स हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला.
News Title- IPL 2024 Qualifiers, Eliminator and Final venue will not have a single match in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या –
पराभवानंतर ऋषभ पंतने वाचला चुकांचा पाढा, सांगितलं पराभवाचं कारण
“उदयनराजे इकडे तिकडे फिरताहेत…”; बिचुकलेचं मोठं वक्तव्य
‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेची सर्वात मोठी घोषणा!
‘आढळरावांना 2019 सालचा बदलाच घ्यायचा असेल तर…’; अमोल कोल्हे थेट बोलले