KKR साठी हिरो ठरला पण चूक ‘लय’ भोवली; युवा खेळाडूवर मोठी कारवाई!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Harshit Rana | आयपीएलच्या सतराव्या हंगामातील तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात खेळवला गेला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात केकेआरने बाजी मारली. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर हा बहुचर्चित सामना खेळवला गेला. आंद्रे रसेलच्या वादळी खेळीच्या जोरावर केकेआरने 200 हून अधिक धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादकडून अखेरच्या काही षटकांमध्ये हेनरिक क्लासेनने स्फोटक खेळी करून सामन्यात रंगत आणली. (Harshit Rana Fine)

कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाज हर्षित राणाला मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. KKR विरुद्ध SRH सामन्यात झालेल्या दोन चुकांमुळे त्याला हा दंड ठोठावण्यात आला. सामन्यादरम्यान हर्षित हैदराबादच्या दोन खेळाडूंसोबत गैरवर्तन करताना दिसला. केकेआरच्या हर्षित राणाने एसआरएचच्या खेळाडूंसोबत कहर केला. त्याने त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला.

KKR साठी हिरो ठरला पण…

हर्षित राणाला SRH विरुद्धच्या सामन्यात झालेल्या 2 चुकांसाठी शिक्षा झाली आहे. त्याने प्रथम एसआरएचचा सलामीवीर मयंक अग्रवालची विकेट घेतल्यानंतर त्याच्यासमोर विचित्र हावभाव केले. त्यानंतर हेनरिक क्लासेनला बाद केल्यानंतर तो त्याच्याशी देखील वाद घालताना दिसला. एकाच सामन्यात झालेल्या या दोन्ही चुकांमुळे हर्षित राणाला त्याच्या मॅच फीच्या 60 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

हर्षित राणाला त्याच्या मॅच फीच्या 60 टक्के दंड ठोठावण्यात आला असून, मयंक अग्रवालसोबत केलेल्या कृत्यासाठी त्याच्या मॅच फीपैकी 10 टक्के रक्कम कापण्यात आली आहे. त्याच्या मॅच फीमध्ये उर्वरित 50 टक्के कपात क्लासेनशी झालेल्या संघर्षामुळे करण्यात आली आहे.

Harshit Rana वर कारवाई

सामन्याच्या शेवटी क्लासेनशी झालेल्या भांडणामुळे प्रकरण थोडे अधिक चिघळले, जे केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने मध्यस्थी करून हाताळले. आयपीएल 2024 मध्ये आचारसंहिता मोडण्याची ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये हर्षित राणा बळी ठरला आहे. हर्षित राणाने 4 षटकात 33 धावा देत 3 बळी घेतले. या तीन विकेट्समध्ये मयंक अग्रवाल आणि हेनरिक क्लासेन या दोन खेळाडूंच्या विकेट्सचाही समावेश होता, ज्यांच्याशी हर्षितचे भांडण झाले होते.

याशिवाय राणाने शाहबाज अहमदला देखील बाहेरचा रस्ता दाखवला. हर्षितची सर्वात आश्चर्यकारक कामगिरी सामन्याच्या शेवटच्या षटकात दिसली, जिथे त्याने 13 धावांचा बचाव केला आणि KKR ला IPL 2024 मधील पहिला विजय मिळवून दिला आणि SRH ची सुरुवात पराभवाने झाली.

News Title- kkr player Harshit Rana fined 60% of his match fees for giving Mayank Agarwal a send off, read here details

महत्त्वाच्या बातम्या –

IPL ची फायनल कुठे? ‘करा किंवा मरा’च्या लढतींचे ठिकाण ठरले, मुंबईत सामना नाही

पराभवानंतर ऋषभ पंतने वाचला चुकांचा पाढा, सांगितलं पराभवाचं कारण

“उदयनराजे इकडे तिकडे फिरताहेत…”; बिचुकलेचं मोठं वक्तव्य

‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेची सर्वात मोठी घोषणा!

‘आढळरावांना 2019 सालचा बदलाच घ्यायचा असेल तर…’; अमोल कोल्हे थेट बोलले