लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगेंचा मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे (24 मार्च) रोजी महत्त्वाची बैठक घेतली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाची काय भूमीका असणार याबदल मनोज जरांगे यांनी बैठक घेण्याचा निर्णय घेतला होता.

आमरण उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांनी गावागावत जाऊन मराठा आरक्षणावर बैठक घेण्यात आली आहे. राज्यात एकीकडे लोकसभा निवडणूकीचं वातावरण असताना दुसरीकडे मनोज जरांगेंनी काय नवीन घोषणा केली याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले जरांगे?

अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंनी (manoj jarange) महत्त्वाची बैठक घेतली यावेळी त्यांनी घोषणा केली आहे.  हजारापेक्षा जास्त जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन ईव्हीएम प्रक्रिया अडचणीत आणण्याची रणनीती मराठा समाजाच्या बैठकीत आखल्याचं कळतंय.

प्रत्येक मतदारसंघातील एक अपक्ष उमेदवार देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर प्रत्येक गावा-गावात मराठा समाज बैठका घेणार आणि अहवाल तयार करणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं. यानंतर 30 मार्चपर्यंत मराठा समाज तयार केलेले अहवाल मनोज जरांगे पाटील यांच्याकडे देणार असल्याची माहिती मिळतेय. तर उमेदवार निश्चितीची घोषणा मनोज जरांगे पाटील करणार असल्याचे त्यांनी म्हटलेय. रविवारी अंतरवाली सराटी या गावी झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली.

प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे, हे मी नाही ठरवले नाही. मी तुम्हाला दोन पर्याय सुचवतो. मराठा समाजाला मी सात महिन्यांत पराभूत होऊ दिले नाही. लोकसभेचा विषय समुद्रासारखा आहे. आपला विषय लोकसभेतील नाही तर विधानसभेतील आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत हा विषय केंद्राचा नाही तर राज्य सरकारचा आहे, असं जरांगे म्हणालेत.

मराठ्यांची शक्ती राज्याला आणि देशाला दाखवायची आहे. उमेदवार देताना कोणत्या जातीचा उमेदवार द्यायचा हे ठरवायचे आहे. मराठ्यांनी अपक्ष लढवायचा निर्णय घेतला तर चार जाती एकत्र आले पाहिजे. राज्यकर्त्यांना यांना हिसका दाखवायचा असेल तर लोकसभा नाही तर विधानसभा महत्त्वाची आहे. आपली मते विखुरली जाऊ नये, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

लग्न करण्याआधी चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी हमखास तपासा

बच्चू कडूंचा मोठा निर्णय?; महायुतीची डोकेदुखी वाढली

महायुतीचा मोठा निर्णय; जानकरांचा आनंद गगनात मावेना

‘कपड्याचं माप द्यायला गेलो तेव्हा…’; शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

“12 एप्रिल रोजी 12 वाजता पवारांचे 12 वाजवणार”; विजय शिवतारेंचं अखेर ठरलं?