“12 एप्रिल रोजी 12 वाजता पवारांचे 12 वाजवणार”; विजय शिवतारेंचं अखेर ठरलं?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vijay Shivtare | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे वेधलं आहे. बारामती मतदारसंघामध्ये यंदा नणंद विरोधात भाऊजय अशी लढत होणार असल्याची चर्चा आहे. मात्र आता या दोघांमध्ये तिसऱ्या उमेदवारानं उडी घेतली. शिवसेना माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर दावा केला. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी समजोता केला, तरीही विजय शिवतारे (Vijay Shivtare) ऐकायचं नाव घेत नाहीत.

त्यांनी निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं. त्यांनी निवडणूक अर्ज भरण्याची वेळ आणि तारीख सांगितली आहे. यामुळे बारामती मतदारसंघामध्ये दोन्ही पवारांचं टेन्शन वाढलं आहे. ” मी 12 एप्रिल रोजी 12 वाजता बारामती लोकसभा मतदारसंघात प्रस्थापितांचे 12 वाजवणार आहे. मतदारसंघामध्ये मला प्रचंड प्रतिसाद मिळत असून विजयी मिच होणार आहे,” असं ते पुरंदरच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये बोलले आहेत.

“पवार कुटुंबाने ग्रामीण भागात दहशत निर्माण केली”

“पवार कुटुंबाने ग्रामीण भागामध्ये दहशत निर्माण केली आहे. दहशतवाद मोडून काढण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे. मी दोन्ही पवारांबाबत सभांमध्ये बोलणार आहे. अजित पवार यांनी अनेक लोकांना त्रास दिला आहे. तर सुप्रिया सुळे यांनी देखील मागील 15 वर्षांमध्ये काम केलं नसल्याचा”, दावा विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला आहे.

विजय शिवतारे बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर

विजय शिवतारे (Vijay Shivtare) काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जात मतदारांशी चर्चा करत आहेत. पुरंदर तालुक्याची मतं त्यांच्या बाजूनं असल्याचा दावा शिवतारे यांनी केला होता. आता ते बारामती लोकसभा मतदारसंघातून लढणार म्हणजे लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी भोरमध्ये जात अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती.

अनंतराव थोपटे यांच्याकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाविनक साद घातली. मला तुमचा अशीर्वाद हवा आहे, असं देखील ते अनंतराव थोपटे यांना म्हणाले होते. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांनी देखील अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. तसेच त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांना अनंतराव थोपटे यांच्या भेटीस पाठवलं होतं.

पहिल्या सभेची घोषणा

“पहिली सभा ही 1 एप्रिलला होणार आहे. पालखी तळावर पहिली सभा होणार आहे. या सभेला कमीत कमी 50-60 लोकं उपस्थित राहणार आहे. माझ्या व्यासपीठावर कोणताही मोठा नेता नसणार. सर्वसामान्य त्या ठिकाणी तेथे दिसतील. माझी ओळखपत्र गावा-गावामध्ये वाटली जातील.”

“12 एप्रिल रोजी उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहे. मला निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर ते लोकांपर्यंत पोहोचवेल. 4 जूनला जनशक्ती काय असते. लोकांच्या भावना काय असतात. हे लक्षात य़ेईल,” असं शिवतारे म्हणाले.

News Title – Vijay Shivtare On Ajit Pawar And Sharad pawar

महत्त्वाच्या बातम्या

“एक राक्षस तर दुसरा ब्रम्हराक्षस, मला दोघांचा खात्मा करायचाय”

…म्हणून अंकिता लोखंडेनं स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी एक रूपयाही घेतला नाही!

“भररस्त्यात त्याने माझ्या ब्रेस्टला….”, मराठी अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

लोकसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे मोठा निर्णय घेणार?

‘5 कोटी रूपये येतात कुठून?’; इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना झापलं