मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | ईडीकडून केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक करण्यात आली. ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईविरोधात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्ली उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी घेण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची याचिका फेटाळली.

अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का

केजरीवाल यांनी दिलेल्या अर्जात म्हटलं होतं की, त्यांची अटक आणि रिमांड हे दोन्ही आदेश बेकायदेशीर आहेत, त्यांची तात्काळ कोठडीतून सुटका करण्यात यावी. दिल्ली उच्च न्यायालयाने ही आव्हान देणारी याचिका तात्काळ नाकारली आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका नाकारल्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सोमवारी होळीची सुट्टी आहे आणि त्यामुळे 27 मार्च (बुधवार) सुट्टीनंतर न्यायालयीन कामकाज पुन्हा सुरू होईल आणि त्यानंतरच खटल्याची सुनावणी होईल.

दरम्यान, दिल्ली दारु घोटाळ्यात 100 कोटींचा गैरव्यवहार झालाचा आरोप आहे. ज्यामध्ये अनेक मोठ्या लोकांची नाव पुढे आली आहे. या प्रकरणात केजरीवाल यांचा काही संबंध आहे का?, याची चौकशी सुरु आहे.

केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवणार का?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. देशभरात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत. तर अरविंद केजरीवाल हे तुरुंगातून सरकार चालवणार असल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र ‘आप’च्या या भूमिकेला अनेकांनी विरोध केला आहे.

केजरीवाल या संकटातून बाहेर येईपर्यंत आता सरकारला तुरुंगातूनच प्रशासकीय कसरत करावी लागणार आहे. दरम्यान अटकेनंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी जल विभागाला एक आदेश दिल्याची माहिती समोर आलीये.

महत्त्वाच्या बातम्या- 

वडिल म्हणून ती गोष्ट राज ठाकरेंनी आजवर केली नाही- अमित ठाकरे

विजय शिवतारेंचा सर्वात मोठा निर्णय!

“एक राक्षस तर दुसरा ब्रम्हराक्षस, मला दोघांचा खात्मा करायचाय”

…म्हणून अंकिता लोखंडेनं स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी एक रूपयाही घेतला नाही!

“भररस्त्यात त्याने माझ्या ब्रेस्टला….”, मराठी अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव