वडील म्हणून ती गोष्ट राज ठाकरेंनी आजवर केली नाही – अमित ठाकरे

Amit Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे नेहमी चर्चेत असतात. अमित ठाकरे (Amit Thackeray) सध्या राजकारणात अॅक्टिव्ह मोडमध्ये आहेत. नुकताच झी युवा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना झी युवा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. झी युवा या मराठी वाहिनीवर ‘झी युवा सन्मान पुरस्कार सोहळा’, 31 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता प्रसारित होणार आहे.

काय म्हणाले अमित ठाकरे?

यावेळी या पुरस्कार सोहळ्याला संबोधित करत असताना त्यांनी आपले वडील राज ठाकरे यांच्याबाबत भाष्य केलं आहे. “माझ्या वडिलांनी मला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने मी इथपर्यंत पोहोचू शकलो. मात्र अजूनही त्यांनी माझ्यासाठी उत्तम काम केलं नाही. त्यांनी अजूनही कौतुकाचा मेसेज केला नाही. मी माझ्या वडिलांचं पालन करतो आणि प्रत्येक निर्णयाचं पालन करतो. मला त्यांच्याकडून प्रोत्सहानाचा मेसेज मिळावा अशी इच्छा आहे. कदाचित मी म्हणावं असं काही केलं नाही. तो दिवस लवकरच येईल आणि मी त्याच दिवसाची वाट पाहिन,” अशा भावना अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी व्यक्त केल्यात.

अमित ठाकरे यांच्या कामाचा थोडक्यात प्रवास

मनसे विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदापासून अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या कामाचा प्रवास सुरू झाला. अमित यांनी समाजातील अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील तळागळातील लोकांशी संवाद साधत व्यथा समजून घेतल्या आहेत. ठाकरे हे नाव त्यांना घराण्यामुळे मिळालं असलं तरीही त्यांचं कर्तुत्व देखील तसंच आहे.

सामान्य जनमानसात जाऊन काम करण्याची त्यांच्यामध्ये इच्छा आहे. विद्यार्थी सेनेच्या माध्यामातून अनेक विद्यार्थी तरूणांचे काम केल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी काही महिन्यांआधी पुणे येथे जात विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पुणे विद्यापीठाच्या गेटपर्यंत आपला मोर्चा मनसे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून नेला. त्यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरे यांची आई शर्मिला ठाकरे यांनी देखील या मोर्चामध्ये आपला सहभाग घेतला.

मुंबई मनपाच्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न अमित ठाकरे यांनी उपस्थित केले. रेल्वे प्रशासनाच्या विकास कामांसाठी त्यांनी पाठपुरावा केला.

तरूणांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. त्यांच्या कामाचा मागोवा घेत झी युवा वाहिनीच्या माध्यमातून अमित ठाकरे यांना नेतृत्व सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

News Title – Amit Thackeray Zee Yuva Puraskar News update

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे मोठा निर्णय घेणार?

‘5 कोटी रूपये येतात कुठून?’; इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना झापलं

“त्यांच्याकडे पहिलवान असले, तर…”; रविंद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांना टोला

नोकरी गेली तरी बँका सहज देणार Personal Loans; जाणून घ्या प्रक्रिया!

देशांतर्गत क्रिकेटला येणार ‘अच्छे दिन’, BCCI ची भारी योजना, खेळाडू होणार मालामाल!