देशांतर्गत क्रिकेटला येणार ‘अच्छे दिन’, BCCI ची भारी योजना, खेळाडू होणार मालामाल!

BCCI | सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा (IPL 2024) थरार रंगला आहे. आयपीएल 2024 साठी 156 भारतीय क्रिकेटपटूंना करारबद्ध करण्यात आले. ज्यामध्ये असे 56 खेळाडू होते ज्यांनी रणजी ट्रॉफीचा एकही सामना खेळला नाही. तर 25 खेळाडू असे आहेत ज्यांनी फक्त 1 सामना खेळला आहे. भारतीय क्रिकेटपटूंना कसोटी सामने खेळण्यासाठी 15 लाख रुपये मिळतात. त्याचबरोबर आता देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचे देखील मानधन वाढवण्याच्या तयारीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आहे.

खरं तर बीसीसीआय रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचा पगार वाढवण्याचा विचार करत आहे. यावर लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय रेड बॉल क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्याने काम करत आहे. याअंतर्गत रणजी करंडक क्रिकेटपटूंच्या पैशात वाढ करण्याच्या निर्णयाला लवकरच मंजुरी मिळू शकते.

देशांतर्गत क्रिकेटला अच्छे दिन?

बीसीसीआय रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना 40,000 ते 60,000 रुपये प्रतिदिन मॅच फी म्हणून देते. तसेच ही रक्कम सर्व हंगामात खेळल्या जाणाऱ्या सामन्यांच्या संख्येवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर एखादा खेळाडू एका हंगामात साखळी फेरीतील सर्व सात सामने खेळला तर त्याला वर्षाला सुमारे 11.2 लाख रुपये मिळतात.

पण, आयपीएलमुळे अनेक मोठे खेळाडू रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याचे टाळतात, परंतु आता बीसीसीआय आपल्या नव्या रणनीतीवर काम करत आहे, जेणेकरून खेळाडू रणजी क्रिकेटला देखील प्राधान्य देतील. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून रणजी करंडककडे पाहिले जाते.

BCCI ची भारी योजना

वृत्तसंस्था ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, आयपीएल 2024 साठी 156 भारतीय क्रिकेटपटूंना करारबद्ध करण्यात आले होते. ज्यामध्ये असे 56 खेळाडू होते ज्यांनी रणजी ट्रॉफीचा एकही सामना खेळला नाही. तर 25 खेळाडूंनी फक्त 1 सामना खेळला आहे. मात्र, आता या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी बीसीसीआय एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. यावर लवकरच मोठा निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे.

रणजी करंडक क्रिकेटपटूंच्या पैशात वाढ करण्याचा निर्णय मंजूर झाल्यास त्याचा खेळाडूंवर कितपत परिणाम होईल हे पाहण्याजोगे असेल. यानंतर बडे भारतीय खेळाडू आयपीएलपेक्षा देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य देतील का? याकडेही सर्वांचे लक्ष असेल.

News Title- BCCI is trying to increase the salaries of players to attract them to the Ranji Trophy tournament
महत्त्वाच्या बातम्या –

24.75 कोटींच्या स्टार्कची जोरदार धुलाई; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

शाहरुख खानच्या कृत्याने वाद! किंग खान स्टेडियममध्ये ‘हे’ करताना दिसला!

KKR साठी हिरो ठरला पण चूक ‘लय’ भोवली; युवा खेळाडूवर मोठी कारवाई!

IPL ची फायनल कुठे? ‘करा किंवा मरा’च्या लढतींचे ठिकाण ठरले, मुंबईत सामना नाही

पराभवानंतर ऋषभ पंतने वाचला चुकांचा पाढा, सांगितलं पराभवाचं कारण