नोकरी गेली तरी बँका सहज देणार Personal Loans; जाणून घ्या प्रक्रिया!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Personal Loans | नवीन खरेदी असो की मग एखाद्या व्यावसायाची नवीन सुरुवात… सर्वसामान्य माणूस अनेकदा कर्जासाठी बँकेची पायरी चढत असतो. बँक खासगी क्षेत्रातील असो की मग सरकारी बँक असो… बँका सामान्यतः नोकरदार लोकांना किंवा व्यावसायिकांना वैयक्तिक कर्ज (Personal Loans) देण्यास प्राधान्य देतात. याचे कारण म्हणजे पर्सनल लोन हे असुरक्षित कर्ज आहे. यामध्ये बँकेचे पैसे बुडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे बँका नोकरी करणाऱ्या अथवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना कर्ज देतात. (How To Take Personal Loans)

कारण काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा व्यावसायिकाला कर्ज दिल्यास पैसे बुडण्याची शक्यता कमी असते. खरं तर सर्वसामान्य माणूस नेहमीच संकटाच्या वेळीच कर्ज घेतो. पण, नोकरी गेल्यावर अथवा पैसे कमावण्याचा कोणताही चालू मार्ग नसल्यावर वैयक्तिक कर्ज (Personal Loans) मिळू शकते का असा अनेकांना प्रश्न पडतो. याचे उत्तर होय असे आहे. कारण इतर काही कागदपत्रांच्या मदतीने बँक तुम्हाला पर्सनल लोन सहज देईल.

बेरोजगारांनाही मिळणार कर्ज

दरम्यान, बँका बऱ्याचदा बेरोजगार अर्जदारांसाठी कठोर पात्रता निकष लावतात, ज्यात उच्च क्रेडिट स्कोअर मर्यादा आणि कमी कर्जाची रक्कम समाविष्ट असते. नोकरी नसण्याच्या वाढत्या जोखमीमुळे, बेरोजगार व्यक्तींना वैयक्तिक कर्जे सामान्यत: नोकरी करणाऱ्या व्यक्तींपेक्षा जास्त व्याजदराने दिली जातात.

नोकरी नसलेल्या अर्जदारांना बँका बऱ्याचदा कठोर पात्रता निकष लावतात. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात व्याज देखील वसूल केले जाते. नोकरी गमावण्याच्या आणि आर्थिक संकटाच्या बाबतीत पेमेंट व्यवस्था किंवा कमी व्याजदर यांयासारखे पर्याय शोधण्यासाठी तुम्हाला संबंधित बँकेशी संपर्क साधावा लागेल.

Personal Loans कसे घ्याल?

सुरक्षित कर्ज (Secured Loan) – जर एखाद्याने नोकरी गमावली असेल तर ती व्यक्ती कार किंवा मालमत्तेचा वापर करून बँकेकडून कर्ज घेऊ शकते. बँक तुमच्या मालमत्तेचा तारण म्हणून वापर करून तुम्हाला वैयक्तिक कर्ज सहज देईल. या प्रकारच्या कर्जाचा एक फायदा म्हणजे बँक तुमच्याकडून कमी व्याज आकारते.

सह-स्वाक्षरीदार कर्ज – एखाद्या व्यक्तीचे स्थिर उत्पन्न असेल तर तो व्यक्ती अशावेळी तुमची मदत करू शकतो. कारण स्थिर उत्पन्न असलेल्या एका क्रेडिटपात्र व्यक्तीला कर्जावर सह-स्वाक्षरी करून तुम्ही सहजपणे कर्ज मिळवू शकता. कर्जाचा ईएमआय न भरल्यास सह-स्वाक्षरीकर्ता कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी घेतो.

News Title- Even if you lose your job, banks can easily give personal loans, know the process
महत्त्वाच्या बातम्या –

देशांतर्गत क्रिकेटला येणार ‘अच्छे दिन’, BCCI ची भारी योजना, खेळाडू होणार मालामाल!

24.75 कोटींच्या स्टार्कची जोरदार धुलाई; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

शाहरुख खानच्या कृत्याने वाद! किंग खान स्टेडियममध्ये ‘हे’ करताना दिसला!

KKR साठी हिरो ठरला पण चूक ‘लय’ भोवली; युवा खेळाडूवर मोठी कारवाई!

IPL ची फायनल कुठे? ‘करा किंवा मरा’च्या लढतींचे ठिकाण ठरले, मुंबईत सामना नाही