24.75 कोटींच्या स्टार्कची जोरदार धुलाई; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

Mitchell Starc | शनिवारी दुसरा सामना कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात खेळवला गेला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने 4 धावांनी विजय मिळवला. (KKR vs SRH) श्रेयस अय्यरच्या संघाने 4 धावांनी निसटता विजय मिळवला. (IPL 2024 News) पण आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी अनेक धावा केल्या. मिचेल स्टार्कने 4 षटकात 53 धावा दिल्या, मात्र या वेगवान गोलंदाजाला एक देखील बळी मिळाला नाही. (Mitchell Starc News)

कोलकाता नाईट रायडर्ससाठी 19 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मिचेल स्टार्कने आपल्या षटकात 4 षटकार दिले. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कची पहिल्याच सामन्यात जोरदार धुलाई झाली. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी अनेक धावा कुटल्या. स्टार्कने 4 षटकात 53 धावा दिल्या. स्टार्कची धुलाई झाल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

अलीकडेच आयपीएल लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 24.75 कोटींना विकत घेतले. अशाप्रकारे मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण मोसमातील पहिल्याच सामन्यात तो सपशेल फ्लॉप झाला. यानंतर क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला.

 

मिचेल स्टार्कला एवढ्या मोठ्या रकमेची किंमत नाही, असे सोशल मीडियावरील चाहत्यांचे म्हणणे आहे. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकात 7 गडी गमावून 208 धावा केल्या. प्रत्युत्तरा सनरायझर्स हैदराबाद संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून 204 धावा करता आल्या.

 

Mitchell Starc ची धुलाई

अशाप्रकारे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने विजयाने मोसमाची सुरुवात केली. सनरायझर्स हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने एकतर्फी झुंज दिली. त्याने अखेरच्या काही षटकांमध्ये षटकारांचा पाऊस पाडला. स्टार्कच्या एकोणिसाव्या षटकात शाहबाज अहमद (1) आणि क्लासेनने (3) षटकार ठोकले.

 

अखेरच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 13 धावांची गरज असताना वेगवान गोलंदाज हर्षित राणाने सामना फिरवला. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर दोन बळी घेऊन त्याने सामना केकेआरच्या बाजूने फिरवला. अखेर हैदराबादला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची गरज असताना शेवटचा चेंडू निर्धाव गेला अन् केकेआरने विजय मिळवला.

News Title- IPL 2024 KKR vs SRH Star Bowler Mitchell Starc give 53 runs against SRH
महत्त्वाच्या बातम्या –

शाहरुख खानच्या कृत्याने वाद! किंग खान स्टेडियममध्ये ‘हे’ करताना दिसला!

KKR साठी हिरो ठरला पण चूक ‘लय’ भोवली; युवा खेळाडूवर मोठी कारवाई!

IPL ची फायनल कुठे? ‘करा किंवा मरा’च्या लढतींचे ठिकाण ठरले, मुंबईत सामना नाही

पराभवानंतर ऋषभ पंतने वाचला चुकांचा पाढा, सांगितलं पराभवाचं कारण

“उदयनराजे इकडे तिकडे फिरताहेत…”; बिचुकलेचं मोठं वक्तव्य