विजय शिवतारेंचा सर्वात मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) हे बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात महायुतीमधील शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवारांविरोधात बंड करण्याची तयारी सूरू केली आहे.

विजय शिवतारेंचा सर्वात मोठा निर्णय!

शिवतारेंचं हे बंड थंड करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रयत्न केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. कारण शिवतारेंनी लोकसभा लढवणार असल्याचा ठाम भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता बारामतीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी जाहीर केली. 12 एप्रिलला 12 वाजता आपण लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

“लोक सांगत आहेत की माघार घेऊ नका”

लोकसभेसाठी आता लोक सांगत आहेत की माघार घेऊ नका. लोक मला कानात सांगतात ही त्यांची भीती आहे. यामुळे आता पर्याय हवा आहे. मतदार संघातून पवार रुपी हुकुमशाही संपवण्यासाठी आता माझे धर्मयुद्ध आहे. मोठे मोठे राजकीय पुढारी सांगत होते की मी काय करणार आहे. पण मी आमदार झालो तेव्हा 25 हजार मतांनी मी जिंकलो. सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला.

अजित पवारांनी खूप पाप केली आहेत. अख्ख्या राज्याला हा ग्रामीण दहशतवाद हा शब्द माहिती पडेल. 70 वर्षात यांनी केलं काय फक्त घुसले यांनी फक्त घुसखोरी केली आहे, असं विजय शिवतारे म्हणालेत.

कपट कारस्थानी पवारांनी अनेकांना संपवलं. आता यांना बाजार दाखवण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात शिवतारेंनी पवारांवर टीका केली आहे. तसेच मला फक्त अजित पवार यांना हरवायचं आहे, असं शिवतारे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“एक राक्षस तर दुसरा ब्रम्हराक्षस, मला दोघांचा खात्मा करायचाय”

…म्हणून अंकिता लोखंडेनं स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी एक रूपयाही घेतला नाही!

“भररस्त्यात त्याने माझ्या ब्रेस्टला….”, मराठी अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

लोकसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे मोठा निर्णय घेणार?

‘5 कोटी रूपये येतात कुठून?’; इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना झापलं