‘5 कोटी रूपये येतात कुठून?’; इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना झापलं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

 Indurikar Maharaj Kirtan | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्या आहेत. जागावाटपाचा तिढा आज सुटेल उद्या सुटेल असं वाटत होतं. मात्र अजूनही तिढा सुटला नाही. राज्याच्या राजकारणावर केवळ राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच ह.भ.प. इंदुरीकर महाराज  (Indurikar Maharaj Kirtan) यांनी सध्या राज्याच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. सध्याचं राजकारण आणि वारकरी सांप्रदायाची तुलना कधीही होऊ शकत नाही अशी जळजळीत टीका त्यांनी केली आहे.

सध्या देशात आणि राज्यामध्ये अनेक घटना घडत असतात. यावर इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj Kirtan) नेहमी आपल्या किर्तनाला संबोधित करत आजू बाजूला घडणाऱ्या घटनांवर भाष्य करतात. अशातच आता त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. किर्तनकारांनी पाच हजार रूपये जास्त मागितले तर लोकं म्हणतात धंदा मांडलाय. सभा घ्यायला 5 कोटी रूपये आले कुठून? असा सवाल त्यांनी आपल्या किर्तनातून केला आहे.

अनेक लोकं इंदुरीकर महाराजांचे किर्तन (Indurikar Maharaj Kirtan) ऐकतात. सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांची किर्तनं प्रसिद्ध आहेत. सामाजिक विषयावर ते नेहमी भाष्य करतात. त्यांची सर्वत्र चर्चा होते. सोलापूर जिल्ह्यातील कुंबेज गावामध्ये इंदुरीकर महाराजांचे किर्तन (Indurikar Maharaj Kirtan) होते. त्यावेळी त्यांनी राजकीय सभांवर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले इंदुरीकर महाराज?

सोलापूर जिल्ह्यातील कुंबेज गावामध्ये इंदुरीकर महाराजांचे किर्तन होते. त्यांनी किर्तन करत असताना राजकीय परिस्थीतीवर भाष्य केलं आहे. “राजकीय सभा आणि किर्तन यांची तुलना कधीच होणार नाही”, असं त्यांनी किर्तन सांगत असताना स्पष्टोक्ती दिली. “किर्तनकारांच्या सभेला लोकं येतात. राजकीय सभेला लोकं आणली जातात. त्यांना पाण्याच्या बाटल्या समोसे दिले जातात,” असं म्हणत त्यांनी राजकीय सभांवर भाष्य केलं आहे.

गौतमी पाटीलवर केलं होतं भाष्य

याआधी इंदुरीकर महाराजांनी नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्या गाण्यावर भाष्य केलं होते. “गौतमी पाटील ही तीन गाण्यांसाठी तीन लाख रूपये घेते. आम्ही पाच हजार रूपये मागितले तर लगेच आमच्यावर बाजार मांडल्याचा आरोप केला जातो,” असं इंदुरीकर महाराज म्हणाले.

गौतमी पाटीलला इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावर माध्यामांनी विचारलं असता, गौतमी पाटीलनं तीन लाख रूपये फी घेत नसल्याचं माध्यमांना सांगितलं होतं.

News Title – Indurikar Maharaj Kirtan News Update

महत्त्वाच्या बातम्या

नोकरी गेली तरी बँका सहज देणार Personal Loans; जाणून घ्या प्रक्रिया!

देशांतर्गत क्रिकेटला येणार ‘अच्छे दिन’, BCCI ची भारी योजना, खेळाडू होणार मालामाल!

24.75 कोटींच्या स्टार्कची जोरदार धुलाई; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

शाहरुख खानच्या कृत्याने वाद! किंग खान स्टेडियममध्ये ‘हे’ करताना दिसला!

KKR साठी हिरो ठरला पण चूक ‘लय’ भोवली; युवा खेळाडूवर मोठी कारवाई!