लोकसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे मोठा निर्णय घेणार?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. जोपर्यंत ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन आणि राज्यभर सभा घेत राहणार, असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणूकीचं वारं देखील वाहू लागलं आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाची काय भूमीका असणार याबदल मनोज जरांगे यांनी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आमरण उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांनी गावागावत जाऊन मराठा आरक्षणावर बैठक घेणार असल्याची घोषणा केली.

बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष-

जालना येथील अंतरवाली सराटी गावात जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज (24 मार्च) रोजी महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत जरांगे काय बोलणार? शिवाय लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची काय भूमीका असणार? याबाबत ही बैठक आहे. या बैठकीसाठी अंतरवालीच्या मैदानावर मंडप उभारण्यात आला आहे. बैठकीसाठी राज्यभरातून मराठा बांधव अंतरवाली सराटीत दाखल होत आहे.

जरांगेंवर गुन्हे दाखल-

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी निर्णायक बैठक बोलवली आहे. मनोज जरांगे यांच्या संवाद दौऱ्या दरम्यान त्यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचबरोबर गावागावातून मराठा समाज लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर बोलवलेल्या बैठकीत मनोज जरांगे काय भूमिका मांडतात हे बघावं लागेल.

सरकारवर निशाणा-

जरांगेंनी सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. दरम्यान, सरकारने एक दिवसीय विशेष अधिवेशन घेऊन जरांगेंच्या मागण्या पुर्ण केल्या. शिवाय मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं. मात्र, ओबीसीमधून आरक्षण पाहिजे असं म्हणत जरांगेंनी सरकारकडे मागणी केली आहे. त्यामुळे जरांगे गावागावात जाऊन सभा घेत आहेत. एवढंच नाही तर जरांगेंनी अनेकवेळा सरकारवर हल्लाबोल केला आहे.

News Title : manoj jarange patil takes important meeting

महत्त्वाच्या बातम्या-

“त्यांच्याकडे पहिलवान असले, तर…”; रविंद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांना टोला

नोकरी गेली तरी बँका सहज देणार Personal Loans; जाणून घ्या प्रक्रिया!

देशांतर्गत क्रिकेटला येणार ‘अच्छे दिन’, BCCI ची भारी योजना, खेळाडू होणार मालामाल!

24.75 कोटींच्या स्टार्कची जोरदार धुलाई; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

शाहरुख खानच्या कृत्याने वाद! किंग खान स्टेडियममध्ये ‘हे’ करताना दिसला!