“भररस्त्यात त्याने माझ्या ब्रेस्टला….”, मराठी अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

Priya Bapat | मराठी अभिनेत्री प्रिया बापटने (Priya Bapat) एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या अभिनयासाठी नेहमी चर्चेत असते. मात्र ती आता एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. दहा वर्षांआधी दादर येथे तिच्या घराजवळ घडलेला किस्सा तिनं सांगितला आहे. तिनं हॉटरफ्लायला मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये तिनं तो किस्सा सांगितला.

प्रिया बापटने (Priya Bapat) नाटक, सिनेमा, वेबसीरिजमधून आपल्या कामाने प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. ती नेहमी कोणत्या न् कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिनं एका मुलाखतीत तिच्याबाबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तिनं एका मुलाखतीमध्ये दहा वर्षांआधी घडलेला धक्कादायक किस्सा सांगितला. तिच्या घराबाहेर एका अज्ञात व्यक्तीने तिच्या ब्रेस्टला हात लावला होता. त्यावेळी ती घाबरली होती. तिला त्यावेळी काहीही सुचत नव्हतं.

काय म्हणाली प्रिया बापट?

प्रिया बापटने ‘हॉटरफ्लाय’या सोशल मीडियावर तिनं मुलाखत दिली. त्यावेळी तिनं धक्कादायक प्रकार सांगितला. “मी शूट संपवून घरी जात होते. माझ्या हातामध्ये सामानाच्या पिशव्या होत्या. दूसऱ्या हातामध्ये मोबाईलवर मी बोलत होते. याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने माझ्या ब्रेस्टला हात लावला. त्यावेळी तो तिथून लगेचच पसार झाला. नेमकं झालं काय हे कळायला मला तीन सेकंद झाले. मी स्तब्ध उभी होते,” असं प्रिया बापट (Priya Bapat) म्हणाली.

बाबांना किस्सा सांगताच…

“मी मागे वळून पाहिलं तर तो माणूस तिथून निघून गेला होता. मी घरी आले पण माझी आई घरी नव्हती. बाबा घरी होते पण त्यांना कसं सांगावं हे मला कळत नव्हतं. मी खूप रडत होते. मी माझ्या बाबांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. जे काही घडलं त्याचं मला वाईट वाटलं, त्याक्षणी असहाय्य झाले होतं. काय करावं हे त्यांनाच कळत नव्हतं. अशा गोष्टी होत असतात, हे तुझ्यासोबत झालं, ते घडायला नको होतं, मी त्याला मारेन, असं काहीच बोलले नाहीत. कारण मारणार तरी कसं”, असं प्रिया बापट म्हणाली.

त्यानंतर प्रिया बापट सावध झाली. त्यावेळी तिनं या मुलाखतीमध्ये अनेक घडलेले किस्से आणि प्रसंग सांगितले आहेत. तिनं आपल्या स्ट्रगलिंग काळातील घडलेल्या घटना देखील सांगितल्या आहेत.

News Title – Priya Bapat misbehave Coincidence Share Interview

महत्त्वाच्या बातम्या

24.75 कोटींच्या स्टार्कची जोरदार धुलाई; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

शाहरुख खानच्या कृत्याने वाद! किंग खान स्टेडियममध्ये ‘हे’ करताना दिसला!

KKR साठी हिरो ठरला पण चूक ‘लय’ भोवली; युवा खेळाडूवर मोठी कारवाई!

IPL ची फायनल कुठे? ‘करा किंवा मरा’च्या लढतींचे ठिकाण ठरले, मुंबईत सामना नाही

पराभवानंतर ऋषभ पंतने वाचला चुकांचा पाढा, सांगितलं पराभवाचं कारण