…म्हणून अंकिता लोखंडेनं स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी एक रूपयाही घेतला नाही!

 Ankita Lokhande | स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा 22 मार्च रोजी सर्वत्र देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची देशभरात चांगली चर्चा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वत: रणदीप हुड्डानं केलं आहे. या सिनेमामध्ये विनायक दामोदर सावरकरांनी देशासाठी केलेली क्रांती, सावरकरांना काळ्या पाण्याची देण्यात आलेली शिक्षा, त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीवर या सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलं.

सावरकरांची भूमिका अभिनेता रणदीप हुड्डानं साकारली आहे. तर सावरकर यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री अंकिता लोखंडेनं (Ankita Lokhande) केली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी अनेक कलाकारांनी आपले शंभर टक्के दिले आहेत. तसेच रणदीप हुड्डानं या चित्रपटाच्या निर्मितीसाठी घर विकलं असल्याची चर्चा आहे.

अंकिता लोखंडेनं साकारली सावरकरांच्या पत्नीची भूमिका

अंकिता लोखंडेनं (Ankita Lokhande) सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. हे पात्र साकारण्यासाठी अंकिताने विशेष मेहनत घेतली आहे. पेहराव आणि तिच्या बोलण्याच्या लहेजामध्ये देखील बदल जाणवू लागतो म्हणजेच तिनं चांगली मेहनत घेतली होती.

अंकिता लोखंडेनं एकही रूपया घेतला नाही

रणदीप हुड्डा हे माझे मित्र आहेत. स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाच्या निर्मितीसाठी त्यांना अर्थिक संकटांना तोंड द्यावं लागलं होतं. ते हा सिनेमा घेऊन माझ्याकडे आले होते. सिनेमाच्या बजेटचं त्यांच्यावर टेन्शन होतं. त्यावेळी मी ठरवलं की यांना आपण साथ देऊ…त्यामुळे मी एकही रूपया घेतला नाही, असं अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)


अंकिता लोखंडेनं (Ankita Lokhande) साकारलेल्या भूमिकेची सर्वत्र चर्चा होतेय. अंकिता ही सावरकरांच्या पत्नीच्या भूमिकेत अगदी चपखल शोभून दिसते. यामुळे अंकितानं केलेली सावरकरांच्या पत्नीची भूमिका आतापर्यंतची सर्वात  लक्षवेधी भूमिका मानली जात आहे.

पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून अंकि़ताने आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरूवात केली होती. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झासी’ या चित्रपटामध्ये देखील तिनं काम केलं होतं. बिग बॉस 17 मध्ये अंकिता सहभागी झाली होती.

News Title – Ankita Lokhande Not Charge For Swantantrya Veer Savarkar Movie

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे मोठा निर्णय घेणार?

‘5 कोटी रूपये येतात कुठून?’; इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना झापलं

“त्यांच्याकडे पहिलवान असले, तर…”; रविंद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांना टोला

नोकरी गेली तरी बँका सहज देणार Personal Loans; जाणून घ्या प्रक्रिया!

देशांतर्गत क्रिकेटला येणार ‘अच्छे दिन’, BCCI ची भारी योजना, खेळाडू होणार मालामाल!