‘कपड्याचं माप द्यायला गेलो तेव्हा…’; शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

मुंबई | बिग बॉस फेम शिव ठाकरेने (Shiv Thakare) नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक अनुभव सांगितला आहे. शिव ठाकरेला (Shiv Thakare) कास्टिंग काऊचचा अनुभव आल्याचं त्याने सांगितलं आहे. शिव नुकतंच भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये पोहोचला होता. यावेळी बोलताना शिवने अनेक चांगले-वाईट अनुभव सांगितले.

शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव

कास्टिंग काऊचबाबत बोलताना त्याने सांगितलं, की बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर एका इव्हेंटसाठी जायचं होतं. त्यासाठी कपडे हवे होते. कपड्यांसाठी एका स्टुडिओमध्ये माप देण्यासाठी गेलो होतो. तिथे एका टीम मेंबरने मला कपडे दाखवायचं सोडून वेगळीच मागणी केल्याचा खुलासा शिवने केलाय.

“तो स्पासाठी बोलवू लागला, मी अस्वस्थ…”

तो स्पासाठी बोलवू लागला. मी अतिशय अस्वस्थ होऊन तिथून परत आलो, पण तो मला मेसेज करुन परत येण्याबाबत विचारत राहिल्याचा किस्सा शिवने शेअर केला.

शिवने पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितलं, की बिग बॉस हिंदी केल्यानंतर त्याला अनेक गोष्टींसाठी पैसे मिळू लागले. रिल्स पोस्ट करण्यापासून ते एखाद्या शोमध्ये गेस्ट म्हणून जाण्यापर्यंत त्याला मानधन मिळू लागलं, असंही शिवने सांगितलं.

कधी-कधी माझा मॅनेजर मला हे लोक कमी पैसे देत असल्याचं सांगायचा, पण माझ्यासाठी ती रक्कम मोठी असल्याचंही शिव म्हणाला. मला बिग बॉस 16 साठी कॉल आला. त्यांनी इतकी रक्कम मला चार्ज केल्याचं ऐकून हैराण झालो असल्याची आठवण शिवने सांगितली. बिग बॉस 16 केल्यानंतर एका वर्षात त्याचं आयुष्यचं बदलल्याचं तो म्हणालाय.

एक काळ असा होता, ज्यावेळी त्याच्याकडे पैसे नव्हते, पण आता तो चांगले पैसे कमावत असल्याचंही त्याने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“12 एप्रिल रोजी 12 वाजता पवारांचे 12 वाजवणार”; विजय शिवतारेंचं अखेर ठरलं?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का!

वडील म्हणून ती गोष्ट राज ठाकरेंनी आजवर केली नाही – अमित ठाकरे

विजय शिवतारेंचा सर्वात मोठा निर्णय!

“एक राक्षस तर दुसरा ब्रम्हराक्षस, मला दोघांचा खात्मा करायचाय”