महायुतीचा मोठा निर्णय; जानकरांचा आनंद गगनात मावेना

Mahadev Jankar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. तसेच अजित पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली. यावेळी महादेव जानकर यांच्या पक्षाला एक जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

रासपला एक जागा सोडणार

महायुतीची बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली आहे. सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, आम्ही जागा वाटपाबाबत जाहीर करु तेव्हाच त्यांना कोणती जागा दिली जाणार हे स्पष्ट करु.

महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या निर्णयामुळे महायुती बळकट होण्यामध्ये आम्हाला सहकार्य होईल, असा विश्वास आहे. राज्याभरात आम्ही 45 प्लसचे उद्दिष्ट ठेवलं आहे. यामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग आणि मोठ्या प्रमाणात योगदान राहिल, असा विश्वास मी तिन्ही पक्षांच्या वतीने व्यक्त करतो, असं तटकरे म्हणाले.

शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल सर्वांचा सन्मान होईल, असा निर्णय होईल. रासपबाबत आम्ही सर्वांनी विचार करुन निर्णय घेतला आहे. एनडीएसाठी जानकर यांच्याकडून चांगली साथ मिळेल, असंही त्यांनी म्हटलंय.

महादेव जानकर महायुतीमध्येच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय आणि त्यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण मोदीजी यांच्यासोबत आहोत, असं जानकरांनी सांगितलं.

मी आधी महायुतीतच होतो. दबावतंत्राचा वापर बिलकूल नाही. मी शरद पवारांचे आभार मानतो. कोणत्या जागेवरुन लढायचं ते लवकरच जाहीर होईल, अशी प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यांना दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

“12 एप्रिल रोजी 12 वाजता पवारांचे 12 वाजवणार”; विजय शिवतारेंचं अखेर ठरलं?

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का!

वडील म्हणून ती गोष्ट राज ठाकरेंनी आजवर केली नाही – अमित ठाकरे

विजय शिवतारेंचा सर्वात मोठा निर्णय!

“एक राक्षस तर दुसरा ब्रम्हराक्षस, मला दोघांचा खात्मा करायचाय”