बच्चू कडूंचा मोठा निर्णय?; महायुतीची डोकेदुखी वाढली

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bachchu Kadu | आगामी लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजप नेत्या नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याच्या चर्चा होत्या. जर नवनीत राणा यांना उमेदवारी दिली तर आपण पाठिंबा द्याल का? असा सवाल माध्यमांनी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना केला होता, त्यावर बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी स्पष्टपणे नाही असं उत्तर दिलं.

आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) अमरावती मतदारसंघातून वेगळा उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. जर नवनीत राणा यांना अमरावतीतून उमेदवारी दिली तर आम्ही महायुतीतून बाहेर पडू असं, बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले आहेत. बच्चू कडू हे महायुतीसोबत असले तरीही ते महायुतीच्या विरोधामध्ये सतत बोलत असतात. त्यांनी आता अमरावती मतदारसंघातून नवीन उमेदवार देणार असल्याची भूमिका स्पष्ट केली.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून बच्चू कडू (Bachchu Kadu) नवीन उमेदवार देणार आहेत. येत्या 3 एप्रिलला उमेदवार उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. लोकसभेला कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं बच्चू कडू माध्यमांशी बोलताना म्हणालेत.

काय म्हणाले बच्चू कडू?

“कार्यकर्ता डावलला गेला त्याला आम्ही उमेदवारी देणार आहोत. आमचा उमेदवार एक ते दीड लाखांच्या फरकाने विजयी होईल. आमचा कार्यकर्ता जाहीर केला तर त्याच्यावर वेगळ्या पक्षातून दबाव येऊ शकतो. यामुळे उमेदवारी जाहीर करत नाही. पण आम्ही 3 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत,” असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

महायुतीत बच्चू कडू नाराज

बच्चू कडू हे सध्या महायुतीमध्ये असले तरीही ते नाराज आहेत. अनेकदा ते आपल्या महायुतीतील नेत्यांवर नाराजी व्यक्त करताना दिसतात. महायुतीमध्ये जागावाटपाबाबत आपली भूमिका कोणीही विचारात घेत नाहीत, असं बच्चू कडू म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीची जागा भाजपचा उमेदवार लढवणार असल्याचं माध्यमांशी बोलताना वक्तव्य केलं होतं. त्यावर बच्चू कडू यांनी या गोष्टीला पाठिंबा देणार नसल्याचा दावा केला आहे.

News Title – Bachchu Kadu Take Big Decision About Amravati Lok Sabha

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का!

वडील म्हणून ती गोष्ट राज ठाकरेंनी आजवर केली नाही – अमित ठाकरे

विजय शिवतारेंचा सर्वात मोठा निर्णय!

“एक राक्षस तर दुसरा ब्रम्हराक्षस, मला दोघांचा खात्मा करायचाय”

…म्हणून अंकिता लोखंडेनं स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटासाठी एक रूपयाही घेतला नाही!