Ramtek Loksabha Twist | लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का सहन करावा लागत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांआधी काँग्रेसला राम राम करत भाजपचं कमळ हाती घेतलं. अशातच आता विदर्भातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानं काँग्रेस पक्षाला गुड बाय करत एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये पक्षप्रवेश केला आहे. यामुळे राज्यामध्ये काँग्रेसला खिंडार पडलं आहे. (Ramtek Loksabha Twist)
विदर्भातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी आपल्या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा पारवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं. पारवे हे रामटेकची (Ramtek Loksabha Twist) जागा लढवणार असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींसोबत काम करायचं असल्याचं सांगितलं.
काय म्हणाले राजू पारवे?
“या देशाचे लोकमान्य नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत मला काम करता येईल”, असं राजू पारवे म्हणाले आहेत. “राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली आहे. मी सर्वांचे धन्यवाद मानतो”, असं राजू पारवे म्हणाले. (Ramtek Loksabha Twist)
“शेवटी विकासाचं राजकारण आहे. आपल्या विभागाचा विकास कसा होईल ते पाहायचं. रामटेकचा विकास कसा होईल, याकडे माझं काम असलं पाहिजे. मी सात महिने बाकी असताना माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. नरेंद्र मोदींसोबत काम करायची माझी इच्छा आहे”, असं राजू पारवे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
रामटेकच्या जागेवर दावा
सर्व नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. रामटेकबद्दल कमिटमेंट झाली आहे. रामटेकची जागा मी लढणार आहे. असं राजू पारवे म्हणाले आहेत. (Ramtek Loksabha Twist)
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर खलबतं पाहायला मिळत आहेत. त्यांची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठी अपडेट दिली आहे. रासपचे सर्वेसर्वा महादेव जाणकर यांना महायुतीनं एक जागा दिली असल्याची माहिती तटकरेंनी सांगितली.
News Title – Ramtek Loksabha Twist Congress Leader Enter In Shiv Sena
महत्त्वाच्या बातम्या
लग्न करण्याआधी चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी हमखास तपासा
बच्चू कडूंचा मोठा निर्णय?; महायुतीची डोकेदुखी वाढली
महायुतीचा मोठा निर्णय; जानकरांचा आनंद गगनात मावेना
‘कपड्याचं माप द्यायला गेलो तेव्हा…’; शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव
“12 एप्रिल रोजी 12 वाजता पवारांचे 12 वाजवणार”; विजय शिवतारेंचं अखेर ठरलं?