धक्कादायक! उज्जैनच्या महाकाल मंदिरात घडली मोठी दुर्घटना

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ujjain Mahakaleshwar Temple l जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वराच्या गर्भगृहात एक मोठी घटना घडी आहे. श्री महाकालेश्वर मंदिरात आज सकाळी भस्म आरती सुरू असताना आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत पुजाऱ्यासह 13 जण भाजले आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात आरतीवेळी गुलाल उधळल्याने आग भडकली असल्याची माहिती समोर आली आहे.

जखमींवर रुग्णालयात उपाचर सुरू :

या दुर्दैवी घटनेदरम्यान मंदिरात हजारो भाविक उपस्थित होते. सर्वजण महाकाल सोबत होळी साजरी करत होते. आरती करत असलेल्या पुजारी संजीव यांच्यावर कोणीतरी गुलाल ओतल्याचे जखमी सेवकाने सांगितले जात आहे. त्यावेळी गुलाल दिव्यावर पडला. गुलालात रसायन असल्याने आग लागली असल्याचे वृत्त आहे. गर्भगृहाच्या चांदीच्या भिंतीला रंगापासून वाचवण्यासाठी तेथे गुलाल, अंबाडी लावण्यात आली. यामध्येही आग पसरली. काही लोकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गर्भगृहात आरती करत असलेले संजीव पुजारी, विकास, मनोज, सेवाधारी आनंद कमल जोशी यांच्यासह 13 जण भाजले.

Ujjain Mahakaleshwar Temple l घटनेची चौकशी होणार :

उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी सांगितले की, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणीही गंभीर नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या घटनेची चौकशी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी दिली आहे.

अपघाताच्या वेळी मुख्यमंत्र्यांचा मुलगा मंदिरात होता :

अपघाताच्या वेळी मंदिरात हजारो लोक उपस्थित होते जे बाबा महाकाल यांच्यासोबत होळी खेळत होते. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा मुलगा वैभव यादव हा देखील अपघाताच्या वेळी मंदिरात होता. बाबा महाकाळ यांच्या कृपेने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली होती.

News Title : Ujjain Mahakaleshwar Temple

महत्त्वाच्या बातम्या- 

आजच्या दिवशी या 4 राशींचे चमकणार भविष्य, जाणून घ्या कोणत्या राशींसाठी असेल शुभ

कंगणाची राजकारणात एंट्री, भाजपने दिलं लोकसभेचं तिकीट, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार

मैदानावर पंड्याने रोहितसोबत केलं असं काही की, चाहते म्हणाले ‘इतका माज बरा नाही’

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगेंचा मोठा निर्णय!

संभाजीराजेंची वडिलांसाठी भावूक पोस्ट, म्हणाले ‘राजघराण्याची झूल न पांघरता’