नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याची काढली इज्जत, पाहा Video

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Hardik Pandya | रविवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (MI vs GT) यांच्यात सामना पार पडला. सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. (ipl 2024) गुजरातने मुंबईचा 6 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. दोन्हीही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. कारण मुंबई आणि गुजरातचे संघ नवनिर्वाचित कर्णधारांच्या नेतृत्वात खेळत आहे. शुबमन गिलकडे गुजरातच्या तर हार्दिक पांड्याकडे मुंबईच्या संघाची धुरा आहे. खरं तर गुजरातच्या संघातून मुंबईत परतलेल्या हार्दिकला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. (Hardik Pandya Troll)

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई आणि गुजरात यांच्यात सामना झाला, जिथे उपस्थित प्रेक्षकांनी हार्दिकला डिवचले. खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये ‘रोहित रोहित’ अशा घोषणांचा पाऊस पडत होता. हार्दिक पांड्याला अनेकदा चाहत्यांनी ट्रोल केले. रोहितची एन्ट्री होताच चाहते जल्लोष करताना दिसले. मात्र, याप्रकरणी हार्दिकने न बोलणे पसंत केले.

प्रेक्षकांकडून घोषणाबाजी

IPL 2024 च्या पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्सने शानदार कामगिरी केली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात गुजरातने गमावलेला सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 168 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने 12 षटकांत 2 गडी गमावून 107 धावा केल्या होत्या. मुंबई हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र गुजरातच्या गोलंदाजांनी आपल्या करिष्माई गोलंदाजीने सामना फिरवला. अखेर 20 षटकांत मुंबईचा संघ केवळ 162 धावा करू शकला.

दरम्यान, मुंबईला विजयासाठी शेवटच्या षटकात 19 धावा करायच्या होत्या. हार्दिकने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर चौकार मारला. मात्र, यानंतर उमेश यादवने दोन चेंडूंत दोन बळी घेतले. येथून गुजरातचा विजय निश्चित झाला आणि पाहुण्या मुंबईने 6 धावांनी सामना गमावला.

 

Hardik Pandya ट्रोल

गुजरात पराभूत होईल आणि मुंबई सहज जिंकेल असे वाटत होते. पण, गुजरातच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांचा पराभव करून विजय मिळवला. आयपीएलच्या सलग 12व्या हंगामातील पहिला सामना मुंबईने गमावला. 2013 नंतर पहिल्याच सामन्यातील पराभव मुंबईची पाठ सोडत नसल्याचे दिसले.

 

मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सने 20 षटकांत 6 बाद 168 धावा केल्या. साई सुदर्शनने संघासाठी (45) सर्वाधिक धावा केल्या, ज्यात 3 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता. तर मुंबईसाठी बुमराहने सर्वाधिक 3 बळी घेतले.

News Title- Mumbai Indians captain Hardik Pandya was trolled by the crowd during the IPL 2024 MI vs GT match
महत्त्वाच्या बातम्या –

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची महागडी गाडी गेली चोरीला

भर मैदानात हे काय घडलं, रोहित आणि बुमराह थेट हार्दिक पांड्याला का भिडले?

लाईव्ह सामन्यात झाला खेळ, हार्दिक पांड्यासमोर कुत्र्याची एन्ट्री! पाहा Video

धक्कादायक! उज्जैनच्या महाकाल मंदिरात घडली मोठी दुर्घटना

आजच्या दिवशी या 4 राशींचे चमकणार भविष्य, जाणून घ्या कोणत्या राशींसाठी असेल शुभ