महत्वाची बातमी! एप्रिलमध्ये ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद

Bank Holidays in April 2024 l बँकेसंदर्भात एक महत्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची याआधी जाहीर केली आहे. यामध्ये एप्रिल 2024 मध्ये विविध झोनमध्ये एकूण 14 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. वास्तविक, आजकाल बँकांशी संबंधित बहुतेक कामे ऑनलाइन केली जातात. पण तरीही बँक खाते उघडणे, कर्ज घेणे अशी अनेक कामे आहेत, ज्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागते. त्यामुळे जर तुम्हाला देखील बँकेच्या शाखेत काम असेल तर सुट्ट्यांची यादी न पाहता बँकेच्या शाखेत गेल्यास तुमची निराशा होऊ शकते.

Bank Holidays in April 2024 l तब्बल 14 दिवस बँक राहणार बंद!

1 एप्रिल 2024: 1 एप्रिल रोजी बँकेला सुट्टी असणार.
5 एप्रिल 2024: बाबू जगजीवन राम आणि जुमात-उल-विदा यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीनगर, जम्मू आणि तेलंगणामध्ये बँक सुट्टी असेल.
7 एप्रिल 2024: साप्ताहिक सुट्टी
9 एप्रिल 2024: गुढी पाडवा/उगादी सण/तेलुगु नववर्ष आणि पहिल्या नवरात्रीमुळे बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इम्फाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगरमध्ये बँक सुट्टी असेल.
10 एप्रिल 2024: ईदमुळे कोची आणि केरळमध्ये बँका बंद राहतील.
11 एप्रिल 2024: ईदनिमित्त देशभरात बँका बंद राहणार.
13 एप्रिल 2024: दुसऱ्या शनिवार असल्यामुळे बँका बंद राहणार.
14 एप्रिल 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असणार.
15 एप्रिल 2024: हिमाचल दिनानिमित्त गुवाहाटी आणि शिमला झोनमध्ये बँका बंद राहणार आहेत.
17 एप्रिल 2024: श्रीराम नवमीमुळे अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, भुवनेश्वर डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, पाटणा, रांची, शिमला, मुंबई आणि नागपूर येथे बँका बंद राहणार.
20 एप्रिल 2024: गरिया पूजेमुळे आगरतळा येथे बँकेला सुट्टी असेल.
21 एप्रिल 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.
27 एप्रिल 2024: चौथ्या शनिवारमुळे बँकांना सुट्टी असेल.
28 एप्रिल 2024: रविवारमुळे बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल.

News Title : Bank Holidays in April 2024

महत्त्वाच्या बातम्या- 

धक्कादायक! उज्जैनच्या महाकाल मंदिरात घडली मोठी दुर्घटना

आजच्या दिवशी या 4 राशींचे चमकणार भविष्य, जाणून घ्या कोणत्या राशींसाठी असेल शुभ

कंगणाची राजकारणात एंट्री, भाजपने दिलं लोकसभेचं तिकीट, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार

मैदानावर पंड्याने रोहितसोबत केलं असं काही की, चाहते म्हणाले ‘इतका माज बरा नाही’

लोकसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगेंचा मोठा निर्णय!