हार्दिकमुळेच मुंबईचा पराभव झाला; इरफानचा संताप, सांगितली घोडचूक!

Hardik Pandya | हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला आपल्या सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. (GT vs MI) गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला आपल्या घरच्या मैदानावर नमवून विजयाचे खाते उघडले. दोन्हीही संघ प्रथमच नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात खेळत आहेत. हार्दिक पांड्याची मुंबईच्या संघात घरवापसी झाली असून त्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. रविवारी हे दोन संघ अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने आले. (IPL 2024 News)

मुंबई इंडियन्स सहज विजय मिळवेल असे वाटत असताना गुजरातने त्यांच्या तोंडचा घास पळवून विजय साकारला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरातने 6 धावांनी बाजी मारली. मुंबईचा संघ निर्धारित 20 षटकांत 9 बाद केवळ 162 धावा करू शकला. खरं तर मुंबईच्या पराभवाला कर्णधार हार्दिक पांड्या जबाबदार असल्याचे माजी खेळाडू इरफान पठाणने म्हटले आहे.

इरफानचा संताप, सांगितली घोडचूक

इरफानने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, हार्दिक पांड्याच्या आधी टीम डेव्हिडला फलंदाजीला का पाठवले? राशिद खानसारख्या फिरकीपटूंचा सामना करण्यात परदेशी खेळाडू अपयशी ठरतात. अशावेळी मी तरी कोणत्याही केवळ भारतीय फलंदाजाला प्राधान्य देईन. म्हणजेच हार्दिकने डेव्हिडच्या आधी फलंदाजीला जायला हवे होते असे पठाणने म्हटले.

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने (GT) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2024 च्या पाचव्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा (MI) 6 धावांनी पराभव केला. गुजरातसाठी उमेश यादवने शेवटच्या षटकात 19 धावा वाचवल्या आणि दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

 

Hardik Pandya वर टीका

अखेरच्या षटकात तंबूत परतलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार हार्दिक पांड्याचाही समावेश होता. हार्दिकने पहिल्या दोन चेंडूत 10 धावा करून सामना जवळपास मुंबईच्या खात्यात टाकला होता, मात्र त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर उमेशने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान गुजरातने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 168 धावा केल्या होत्या. 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 20 षटकांत केवळ 162 धावा केल्या आणि सामना 6 धावांनी गमावला.

News Title – IPL 2024 MI vs GT Match captain Hardik Pandya criticized by irfan pathan
महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाची बातमी! एप्रिलमध्ये ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद

नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याची काढली इज्जत, पाहा Video

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची महागडी गाडी गेली चोरीला

भर मैदानात हे काय घडलं, रोहित आणि बुमराह थेट हार्दिक पांड्याला का भिडले?

लाईव्ह सामन्यात झाला खेळ, हार्दिक पांड्यासमोर कुत्र्याची एन्ट्री! पाहा Video