भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची महागडी गाडी गेली चोरीला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

 JP Nadda | भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेली आहे. ड्रायव्हर कार सर्विससाठी गोविंदपुरी,दिल्ली येथे गेला होता. 19 मार्च रोजी याच सर्व्हिस सेंटरमधूनच फॉर्च्युनर कार चोरीला गेली होती. चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

पोलिस आता कारचा शोध घेत आहेत. राजधानी दिल्लीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये दर 14 मिनिटांनी वाहन चोरीची एक घटना घडते, असाही एक रिपोर्ट समोर आला आहे. आता तर थेट भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचीच कार चोरीला गेल्याने चर्चा रंगली आहे.

जेपी नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला

ACKO ने काही दिवसांपूर्वी वाहन चोरीच्या घटनांवर आधारित ‘थेफ्ट अँड द सिटी 2024’ ची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली होती, ज्यामध्ये 2022 आणि 2023 दरम्यान भारतात वाहन चोरीच्या घटनांमध्ये 2.5 पट वाढ झाल्याची नोंद करण्यात आली होती.

यासोबतच या अहवालात चोरट्यांनी कोणत्या कारला सर्वाधिक लक्ष्य केलं आहे, चोरीच्या घटनांचे हॉट स्पॉट आणि कोणत्या शहरात सर्वाधिक वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत, असे अनेक खुलासे या अहवालात करण्यात आले आहेत.

दिल्लीमध्ये दर 14 मिनिटांनी वाहन चोरी

एका मिडिया रिपोर्टनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये दर 14 मिनिटांनी वाहन चोरीची घटना घडते.2023 मध्ये अशी दररोज वाहन चोरीची सरासरी 105 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. सर्वाधिक वाहन चोरीच्या घटना घडण्याचे दिवसही सारखेच आहेत.

मंगळवार, रविवार आणि गुरुवार अशा तीन दिवशी सर्वाधिक चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या तीन दिवशी लोकांनी विशेष सावध राहण्याची गरज आहे. मात्र, या तीन दिवसांतच सर्वाधिक वाहन चोरीच्या घटना का घडल्या, हे अद्याप उघड झालं नाही.

News Title : BJP president JP Nadda wife expensive car stolen

महत्त्वाच्या बातम्या-

भर मैदानात हे काय घडलं, रोहित आणि बुमराह थेट हार्दिक पांड्याला का भिडले?

लाईव्ह सामन्यात झाला खेळ, हार्दिक पांड्यासमोर कुत्र्याची एन्ट्री! पाहा Video

धक्कादायक! उज्जैनच्या महाकाल मंदिरात घडली मोठी दुर्घटना

आजच्या दिवशी या 4 राशींचे चमकणार भविष्य, जाणून घ्या कोणत्या राशींसाठी असेल शुभ

कंगणाची राजकारणात एंट्री, भाजपने दिलं लोकसभेचं तिकीट, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार