“काळे झेंडे दाखवणाऱ्या मुलांवर गुन्हा….”; पंकजा मुंडेंची पोलिसांकडे मोठी मागणी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची काल (24 मार्च) रोजी अंतरवाली सराटी गावात महत्त्वाची बैठक पार पडली. गेल्या अनेक महिन्यांपासून जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करत आहेत. शिवाय, गावा गावात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. जरांगेंनी सरकारकडे काही मागण्या देखील केल्या होत्या दरम्यान, सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण करत एक दिवसीय विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देखील दिलं. अंतरवाली सराटी येथे पार पडलेल्या बैठकीत मराठा समाज आक्रमक झालेला पहायला मिळालं. दरम्यान, काल (24 मार्च) रोजी पंकजा मुंडे यांचा बीड दौरा असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत.

नेमकं काय घडलं?

पंकजा मुंडे यांचा दौरा असताना, आक्रमक झालेले मराठा (Manoj Jarange) बांधव यांनी मुंडे यांच्या गाडीचा ताफा अडवला. तसंच, काही मुलांनी त्यांना काळे झेंडे देखील दाखवले. या वेळेस एक मराठा लाख मराठा आशा प्रकारच्या घोषणा देखील करण्यात आल्या होत्या. दरम्यान या वेळी बीड जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस ठाण्यात याबदल गुन्हे दाखल करण्यात आले.

मात्र अशा प्रकारचे गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणीच पंकजा मुंडे यांनी पोलिसांकडे केली आहे. पंकजा मुंडे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रामध्ये ती लहान मुले आहेत. केवळ झेंडे दाखवले म्हणून लहान मुलावरती गुन्हे दाखल करू नका अशी विनंती या पत्रातून केली आहे.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

माध्यमांशी बोलत असताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, अत्यंत साधेपणातून उभे राहिलेले आंदोलन आणि त्यातून मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका ही स्वागतहार्य आहे. यापूर्वी सुद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मी कोणत्याही राजकीय पक्षासोबत उभा राहणार नाही, हे सांगितले होते. जरांगे पाटील यांनी ते पुन्हा सिद्ध केले. शेवटी निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार देणे न देणे हा त्यांचा विषय आहे, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

बैठकीत जरांगे काय म्हणाले?

प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे, हे मी ठरवले नाही. मी तुम्हाला दोन पर्याय सुचवतो. मराठा समाजाला मी सात महिन्यांत पराभूत होऊ दिले नाही. लोकसभेचा विषय समुद्रासारखा आहे. आपला विषय लोकसभेतील नाही तर विधानसभेतील आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत हा विषय केंद्राचा नाही तर राज्य सरकारचा आहे, असं जरांगे म्हणालेत.

News Title : manoj jarange becomes aggressive

महत्त्वाच्या बातम्या-

“मी सोलापूरची लेक म्हणून…”, प्रणिती शिंदेंचं थेट राम सातपुतेंना पत्र

राज्यात उन्हाचा कडाका वाढणार, हवामान विभागाचा इशारा

गुड न्यूज! सोन्याच्या किंमती घसरल्या; जाणून घ्या आजचे दर

आज RCB विरुद्ध PBKS यांच्यात रंगणार चुरशीची लढत; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11