पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही

PM Kisan 17th Installment Date l भारत सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते. यापैकी एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना शासन आर्थिक मदत करते. सध्या देशातील करोडो शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेत सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम वर्षभर हप्त्यांमध्ये दिली जाते. याचा अर्थ प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

28 फेब्रुवारी 2024 रोजी सरकारने योजनेचा 16 वा हप्ता जारी केला होता. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला मात्र काही शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले आहे. आता या योजनेच्या 17 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. तुम्हालाही 17 व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पीएम किसानची नोंदणी प्रक्रिया करावी लागणार आहे.

PM Kisan 17th Installment Date l अशाप्रकारे करावी नोंदणी :

– पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने प्रथम पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

– त्यानंतर उजव्या बाजूला Farmers Corner वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोंदणी करावी लागेल.

– शेतकऱ्यांना नोंदणी करताना आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीची कागदपत्रे, पत्ता पुरावा द्यावा लागेल.

PM Kisan 17th Installment Date l या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही :

– ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि जमिनीची पडताळणी केलेली नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
घरातील फक्त एका सदस्याला योजनेचा लाभ मिळेल.

– कुटुंबातील कोणत्याही सदस्याची सरकारी नोकरी असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

– जर कुटुंबातील कोणताही सदस्य कोणत्याही व्यवसायात काम करत असेल (जसे की वकील, डॉक्टर, प्राध्यापक इ.) तर तो देखील योजनेसाठी पात्र नसणार आहे.

– जे शेतकरी दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करतात त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे ज्या शेतकऱ्यांची स्वतःची जमीन आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

News Title : PM Kisan 17th Installment Date

महत्त्वाच्या बातम्या- 

आज RCB विरुद्ध PBKS यांच्यात रंगणार चुरशीची लढत; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

मुंबईच्या संघात वाद? रोहित शर्माची नाराजी, Inside Video Viral

अजित पवारांंचं टेन्शन वाढलं, शिवसेनेचा ‘तो’ मेसेज व्हायरल

ट्वेंटी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची रणनीती; बोर्डानं घेतला मोठा निर्णय!

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ रिक्त पदांवर भरती सुरू