ट्वेंटी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची रणनीती; बोर्डानं घेतला मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pakistan | मागील काही दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. वन डे विश्वचषक 2023 पासून बोर्डात अनेक बदल करण्यात आले आहेत. आता पीसीबीने नवीन 7 सदस्यीय निवड समितीची घोषणा केली आहे, ज्यामध्ये कोणालाच अध्यक्षपद देण्यात आले नाही. या समितीत संघाच्या माजी कसोटीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मोहम्मद युसूफ, अब्दुल रज्जाक आणि असद शफीक यांचा समावेश आहे. (Pakistan Cricket Board)

याशिवाय आतापर्यंत निवड समितीचे अध्यक्ष असलेला वहाब रियाझ देखील एक भाग आहे. चार खेळाडूंशिवाय राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक आणि कर्णधार हे देखील समितीचा भाग असतील. या निवड समितीमध्ये विश्लेषक देखील असणार आहेत. अशा प्रकारे संपूर्ण 7 सदस्यीय समिती तयार केली जाईल.

पाकिस्ताननं आखली रणनीती

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी निवड समितीबद्दल सांगितले की, यातील वेगळी गोष्ट अशी आहे की येथे सर्वांना समान अधिकार असतील आणि त्यात अध्यक्ष कोणीही नसेल. पीसीबी अध्यक्षांनी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर पत्रकार परिषदेत नवीन निवड समितीची घोषणा केली.

निवड समितीमध्ये प्रशिक्षक आणि कर्णधार यांचेही महत्त्वाचे योगदान असेल. मात्र, पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये प्रशिक्षक आणि कर्णधार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पाकिस्तान परदेशी प्रशिक्षकाच्या शोधात आहे. पीसीबीच्या यादीत असे काही उमेदवार आहेत ज्यांनी भारतात अनेक पदांवर काम केले आहे, असे नक्वी यांनी सांगितले.

Pakistan संघात फेरबदल

आताच्या घडीला शान मसूद हा पाकिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे, मात्र जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 विश्वचषकापर्यंत पाकिस्तान संघाला मायदेशात आणि परदेशी दौऱ्यांवर काही ट्वेंटी-20 मालिका खेळायच्या आहेत. वन डे विश्वचषकानंतर पाकिस्तान बोर्डाने शाहीन आफ्रिदी ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार असेल, अशी घोषणा केली होती, परंतु जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटच्या विश्वचषकासाठी त्याला अद्याप कर्णधार बनवण्यात आलेले नाही.

एकूणच शाहीन शाह आफ्रिदी आगामी विश्वचषकात पाकिस्तानी संघाचा कर्णधार असेल याची खात्री नाही. माहितीनुसार, मोहम्मद रिझवानकडे संघाचे कर्णधारपद सोपवले जाणार आहे. वन डे विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबर आझमने सर्व फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.

News Title- Pakistan cricket board big decision ahead of t20 world cup 2024
महत्त्वाच्या बातम्या –

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ रिक्त पदांवर भरती सुरू

भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कंगनाचं मोठं वक्तव्य, म्हणाली…

GT vs MI सामन्यात नाट्यमय घडामोडींचा पाऊस; चाहत्यांमध्ये हाणामारी, Video Viral

कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार घेण्याचं स्वप्न होणार साकार; बाजारात या 3 कार लवकरच धुमाकूळ घालणार

पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरल्या?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट