भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कंगनाचं मोठं वक्तव्य, म्हणाली…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kangana Ranaut | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. भाजपच्या उमेदवारांची पाचवी यादी काल जाहीर झाली. यामध्ये भाजपच्या अनेक नेत्यांना तिकीट देण्यात आलं. अशातच बॉलिवूडची अभिनेत्री क्विन कंगना राणौतला लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. यामुळे कंगना (Kangana Ranaut) खूश आहे. लोकसभेच्या निवडणुकीचं तिकीट मिळाल्यानंतर कंगनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

कंगनानं (Kangana Ranaut) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. तिनं भाजपचे आभार मानले आहेत. कंगना नेहमी पक्षाच्या बाजूनं वक्तव्य करायची. यामुळे पक्षानेही कंगनाला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी जाहीर केली आहे. कंगना नेहमी तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हिमाचल प्रदेशचे फोटो शेअर करत असते.

काय आहे पोस्ट?

तिला तिच्या भागातून उमेदवारी मिळाल्याने कंगना (Kangana Ranaut) आनंदीत आहे. “माझा प्रिय भारत देश आणि भारतीय जनता पक्षाचं मी नेहमीच समर्थन करत आली आहे. आज भाजपच्या नेतृत्वाने मला माझी मंडी हिमाचल प्रदेश मतदारसंघातून लोकसभा उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर करण्यात आली.”

“मी एक योग्य कार्यकर्ता आणि लोकसेवक”

“मी या ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या हायकमांडच्या निर्णयाचं स्वागत करते. आज मी अधिकृतरित्या पक्षात सहभागी झाले आहे याचा मला अभिमान आहे. मी एक योग्य कार्यकर्ता आणि लोकसेवक आहे,” अशी पोस्ट कंगनानं (Kangana Ranaut) केली.

loksa 2024031200040

कंगना राणौतनं काही महिन्यांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यामुळे ती लोकसभा निवडणूक लढणार हे निश्चित आहे. कंगनावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनेक दिवसांपासून कंगनाला उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला. राजकारणामध्ये तिचा पराभव होणार की ती विजयी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कंगना प्रभावशाली अभिनेत्री

क्वीन, तनू वेड्स मनू, झाँसी, पंगासारख्या सिनेमामध्ये अभिनेत्री कंगना राणौतनं काम केलं आहे. मात्र त्यानंतर तिचे काही सिनेमे फ्लॉप झाले. तिचा आगामी इमर्जन्सी सिनेमा लवकरच देशभरामध्ये प्रदर्शित होणार आहे.

News Title – Kangana Ranaut Get Himachal Lok sabha Election ticket After Social Media Post

महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याची काढली इज्जत, पाहा Video

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची महागडी गाडी गेली चोरीला

भर मैदानात हे काय घडलं, रोहित आणि बुमराह थेट हार्दिक पांड्याला का भिडले?

लाईव्ह सामन्यात झाला खेळ, हार्दिक पांड्यासमोर कुत्र्याची एन्ट्री! पाहा Video

धक्कादायक! उज्जैनच्या महाकाल मंदिरात घडली मोठी दुर्घटना