GT vs MI सामन्यात नाट्यमय घडामोडींचा पाऊस; चाहत्यांमध्ये हाणामारी, Video Viral

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

GT vs MI | मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (GT vs MI) यांच्यातील सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. मुंबईचा नवनिर्वाचित कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. गुजरातला पराभूत करून मुंबई विजय मिळवेल असे अपेक्षित असताना यजमानांनी कमाल केली अन् सामन्याचा निकाल बदलला. मुंबई इंडियन्स सहज विजय मिळवेल असे वाटत असताना गुजरातने त्यांच्या तोंडचा घास पळवून विजय साकारला.

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरातने 6 धावांनी बाजी मारली. मुंबईचा संघ निर्धारित 20 षटकांत 9 बाद केवळ 162 धावा करू शकला. (IPL 2024 News) हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सला आपल्या सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. (GT vs MI) दरम्यान, या सामन्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

चाहत्यांमध्ये हाणामारी

गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सला आपल्या घरच्या मैदानावर नमवून विजयाचे खाते उघडले. दोन्हीही संघ प्रथमच नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात खेळत आहेत. हार्दिक पांड्याची मुंबईच्या संघात घरवापसी झाली असून त्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. रविवारी हे दोन संघ अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने आले.

सध्या सोशल मीडियावर नरेंद्र मोदी स्टेडियममधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चाहते एकमेकांना भिडल्याचे दिसते. कालच्या सामन्यात प्रेक्षकांनी हार्दिक पांड्या विरूद्ध रोहित शर्मा असे वातावरण तयार केले होते. हार्दिक दिसताच चाहते रोहित रोहित अशा घोषणांचा पाऊस पाडताना दिसले.

 

GT vs MI थरार

दरम्यान, गुजरात टायटन्सने (GT) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर IPL 2024 च्या पाचव्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा (MI) 6 धावांनी पराभव केला. गुजरातसाठी उमेश यादवने शेवटच्या षटकात 19 धावा वाचवल्या आणि दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

खरं तर 2013 पासून मुंबईचा संघ आपल्या सलामीच्या सामन्यात पराभूत होत आला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान गुजरातने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 168 धावा केल्या होत्या. 169 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 20 षटकांत केवळ 162 धावा केल्या आणि सामना 6 धावांनी गमावला. शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरातने विजयी सलामी दिली.

News Title – IPL 203 GT vs MI A fight took place between fans last night at the Narendra Modi Stadium
महत्त्वाच्या बातम्या –

कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार घेण्याचं स्वप्न होणार साकार; बाजारात या 3 कार लवकरच धुमाकूळ घालणार

पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरल्या?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट

हार्दिकमुळेच मुंबईचा पराभव झाला; इरफानचा संताप, सांगितली घोडचूक!

महत्वाची बातमी! एप्रिलमध्ये ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद

नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याची काढली इज्जत, पाहा Video