अजित पवारांंचं टेन्शन वाढलं, शिवसेनेचा ‘तो’ मेसेज व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Baramati Lok sabha | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. राज्याच्या बारामती लोकसभा (Baramati Lok sabha) मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बारामती लोकसभा (Baramati Lok sabha) मतदारसंघामध्ये पवार विरूद्ध पवार अशी लढत होणार असल्याची चर्चा आहे. मात्र आता दोघात तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री झाली आहे. शिवसेना माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा (Baramati Lok sabha) मतदारसंघामधून लढण्याचा दावा केला आहे. यामुळे अजित पवार यांचं टेन्शन वाढलं. मात्र आता यामध्ये आणखी एक भर पडली आहे.

बारामती मतदारसंघातील (Baramati Lok sabha) खडकवासला येथून एक मेसेज व्हायरल होत आहे. त्या मेसेजची आता राज्यभरामध्ये चर्चा होऊ लागली आहे. या मेसेजमध्ये इतर कोणत्याही पक्षाला शिवसेनेची गरज नसल्याचं लिहिण्यात आलं आहे. त्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. या मसेजमुळे अजित पवार यांच्या अडणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा सुनेत्रा पवार यांना विरोध

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला विरोध आहे. खडकवासला मतदारसंघातील शिवसेनेला विचारात घेत नसल्यानं शिवसैनिक नाराज झाले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करायचा नसून पुणे लोकसभेतील मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करूयात, असा मेसेज शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना येत आहे. हा मेसेज शिवसेनेच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर आला.

अजित पवार यांना खडकवासलातून विरोध

बारामती लोकसभेमधून अजित पवार यांना संघर्ष करावा लागणार आहे. महायुतीतील पक्ष अजित पवार यांच्यासोबत नाहीत. तसेच कुटुंबदेखील अजित पवार यांच्याविरोधामध्ये आहे. यामुळे आता अजित पवार यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. शिवतारे यांच्यानंतर खडकवासला येथील शिवसेना पदाधिकारी नाराज आहेत. हा मसेज पाठवणारे पदाधिकारी कोण याबाबत अद्यापही माहिती समोर आली नाही.

viral message

बारामतीच्या रिंगणात आणखी एक उमेदवार

प्रकाश शेंडगे यांच्या बहुजन मोर्चाच्या माध्यमातून आणखी एक ओबीसी चेहरा बारामती मतदरासंघातून लढणार असल्याच्या चर्चा आहे. दौंड येथील महेश भागवत यांनी बारामती लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये उडी घेतली आहे.

बारामती मतदारसंघामध्ये एकूण 65 टक्के ओबीसी मतदार वर्ग आहे. इतर मागासवर्ग असल्याने जातीय समीकरणं आणि गणित जुळवून आपला विजय निश्चित होईल असा त्यांनी दावा केला.

News Title – Baramati Lok sabha Election Big Update About Ajit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ रिक्त पदांवर भरती सुरू

भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कंगनाचं मोठं वक्तव्य, म्हणाली…

GT vs MI सामन्यात नाट्यमय घडामोडींचा पाऊस; चाहत्यांमध्ये हाणामारी, Video Viral

कमी बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार घेण्याचं स्वप्न होणार साकार; बाजारात या 3 कार लवकरच धुमाकूळ घालणार

पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरल्या?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट रेट