आहेर आणू नका पण मोदींना…; लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

Narendra Modi | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाहते कशा पद्धधीतीनं प्रचार करतील याचा काही नेम नाही. सध्या देशामध्ये नरेंद्र मोदींना (Narendra Modi) निवडून आणण्यासाठी चाहते वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार करताना दिसत आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा आणि मध्यप्रदेशात लग्नपत्रिकेतून अनोखी मागणी करण्यात आली आहे. आहेर आणू नका पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) मत द्या, अशी मागणी पत्रिकेमध्ये करण्यात आली आहे.

2019 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांची लाट होती. तर आता 2024 मध्ये मोदींची त्सुनामी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) विजयी करायचं असं पत्रिकेत लिहिलं होतं.

तेलंगणाच्या लग्नपत्रिकेतून आवाहन

तेलंगाणामधील संगारेड्डी जिल्ह्यातील लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. नंदिकंती नरसिमलू आणि त्यांची पत्नी नंदिकंती निर्मला यांचा मुलगा साई कुमार यांचे 4 एप्रिल रोजी लग्न -आहे. साई कुमारचे लग्न महिमा रानी हिच्याशी होत आहे. लाकडापासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंचा व्यवसाय करणारे नरसिमलू यांनी अनोखी लग्नपत्रिका तयार केली आहे. त्या पत्रिकेमध्ये नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा फोटो वापरण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांना मतदान करणे हेच आमच्यासाठी महत्त्वाचं गिफ्ट आहे, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.

marriage card 2

नवऱ्या मुलाच्या वडिलांनी आपल्या पत्रिकेवर भाष्य केलं आहे. माझी कल्पना कुटुंबामध्ये मांडली तेव्हा सर्वांना खूप आवडली. घरातील सर्वजण म्हणाले की होय असं केलं पाहिजे. त्यानंतर मी निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी सुरूवात केली. लग्नपत्रिका पाहून लोकं आश्चर्यचकित झाले. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ही पत्रिका शेअर करण्यात आली होती. यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया आल्या आहेत.

उजैनमधील लग्नपत्रिकेत मोदींचा प्रचार

उजैनमधील लग्नपत्रिकेत मोदींचा प्राचार करण्यात आला आहे. तेलंगणाप्रमाणे उजैनमध्येदेखील लग्नपत्रिकेत मोदींचा प्रचार करण्यात आला. त्या लग्नपत्रिकेमध्ये 2019 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांची लाट होती. तर आता 2024 मध्ये मोदींची त्सुनामी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयी करायचं असं पत्रिकेमध्ये लिहिलं होतं.

भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे चाहते, मोदींचे चाहते लग्नपत्रिकेमध्ये मोदींचा प्रचार करत आहेत. देशामध्ये हे पहिल्यांदाच घडलं आहे. अशा पद्धतीचा प्रचार याआधी कोणीही केला नसेल.

News Title – Narendra Modi Election Pramotion Via Marriage Invitation Card

महत्त्वाच्या बातम्या

गुड न्यूज! सोन्याच्या किंमती घसरल्या; जाणून घ्या आजचे दर

आज RCB विरुद्ध PBKS यांच्यात रंगणार चुरशीची लढत; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

मुंबईच्या संघात वाद? रोहित शर्माची नाराजी, Inside Video Viral

अजित पवारांंचं टेन्शन वाढलं, शिवसेनेचा ‘तो’ मेसेज व्हायरल

ट्वेंटी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानची रणनीती; बोर्डानं घेतला मोठा निर्णय!