लेकीला उमेदवारी न दिल्यानं विजय वडेट्टीवर नाराज?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vijay Wadettiwar | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. यापार्श्वभूमीवर भाजपने आपल्या उमेदवारांच्या पाच याद्या जाहीर केल्या आहेत. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाची काल पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या लेकीला उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती मात्र तसं झालं नाही. म्हणून आता विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) नाराज असल्याची चर्चा आहे.

लेकीला उमेदवारी न दिल्यानं विजय वडेट्टीवर नाराज?

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी काल जाहीर करण्यात आली. त्यामध्ये विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची लेक शिवानी वडेट्टीवार यांचं नाव नव्हतं. दिवंगत काँग्रेस नेते बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांचं उमेदवारांच्या यादीमध्ये नाव असल्याने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावर आता प्रतिभा धानोरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

लेकीच्या उमेदवारीवर विजय वडेट्टीवार म्हणाले…

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी चंद्रपूरच्या उमेदवारीवर भाष्य केलं. “पक्षाने जो निर्णय घेतला तो मान्य आहे. शिवानीने उमेदवारी मागितली आहे. पण ती दिली नाही. मला शक्य असेल तर प्रचारासाठी तिथे जाईल. मी काँग्रेसचा नेता आहे. मला महाराष्ट्रभर काम करायचं आहे. दिल्लीला हादरे देण्याची हिंमत आणि शक्ती महाराष्ट्रामध्ये आहे.”

यावेळी बोलत असताना त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. “काही लोकांना सत्तेमुळे शहाणपणा सुचलाय तो उशीरा सुचलाय. लोकसभेची उमेदवारी गळ्यात पडल्याबरोबर त्याला काँग्रेसची हुकुमशाही दिसते. असं वाटतं की घोडा पुढे दौडत असताना गाढव आवाज काढत आहे असं वाटतं आणि स्वत:ला घोडा समजतो”, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

“काँग्रेसला जिंकून द्यायचं”

“पुरोगामी विचाराला घेऊन चालणारा विदर्भ हा नेहमी काँग्रेससोबत राहिला आहे. संकटकाळामध्ये काँग्रेसनं विदर्भाला साथ दिली आहे. विदर्भातील पाचही लढती अनुकूल आहे. चारही ठिकाणी काँग्रेस भाजपविरोधात लढत आहे”, असं वडेट्टीवार म्हणाले.

“काँग्रेसला जिंकून द्यायचं आणि या पाचही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही.” असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी दिला.

News Title – Vijay Wadettiwar Nurvous About His Doughter Shivani Wadettiwar not Get Lok sabha Ticket

महत्त्वाच्या बातम्या

पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही

“मी सोलापूरची लेक म्हणून…”, प्रणिती शिंदेंचं थेट राम सातपुतेंना पत्र

राज्यात उन्हाचा कडाका वाढणार, हवामान विभागाचा इशारा

गुड न्यूज! सोन्याच्या किंमती घसरल्या; जाणून घ्या आजचे दर

आज RCB विरुद्ध PBKS यांच्यात रंगणार चुरशीची लढत; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11