विराट ‘नंबर वन’! किंग कोहलीची ऐतिहासिक खेळी, ठरला पहिला भारतीय

Virat Kohli

Virat Kohli | आयपीएलचा सतरावा हंगाम विविध कारणांनी प्रसिद्धीच्या झोतात आहे. (IPL 2024) नेहमीप्रमाणे यंदा देखील प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये आयपीएलचे सामने पार पडत आहेत. जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल (IPL) म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच. यंदाच्या हंगामातील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यात पार पडला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात आरसीबीने 4 गडी राखून बाजी मारली. (IPL 2024 News)

नाणेफेक जिंकून आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरू येथील चिन्नस्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 176 धावा केल्या. पाहुण्या संघाकडून कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक 45 धावांची खेळी केली.

विराट ‘नंबर वन’!

शिखर धवन व्यतिरिक्त सिमरन सिंग (25), लियाम लिव्हिंगस्टोन (17) आणि सॅम करनने (17) धावा केल्या. आरसीबीकडून मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी गोलंदाजीत कमाल केली. त्या दोघांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले, तर यश दयाल आणि अल्झारी जोसेफ यांना 1-1 बळी घेण्यात यश आले. पंजाबने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 176 धावा केल्या होत्या.

पंजाबने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमान संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक खेळी केली. त्याची ही खेळी ऐतिहासिक ठरली असून किंग कोहली ट्वेंटी-20 मध्ये 100 हून अधिकवेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटच्या नावावर नाना विक्रमांची नोंद असून आता त्यात आणखी भर पडली आहे.

Virat Kohli ची ऐतिहासिक खेळी

पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग आरसीबीने 4 गडी आणि 4 चेंडू राखून पूर्ण केला. यजमानांनी 19.2 षटकांत 6 बाद 178 धावा करून विजय साकारला. विराटने अप्रतिम खेळी केल्यानंतर दिनेश कार्तिक फिनीशरच्या भूमिकेत दिसला. त्याने 10 चेंडूत 28 धावा करून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

दिनेश कार्तिकने अखेरच्या काही षटकांमध्ये रूद्रावतार धारण केले. त्याने 2 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 28 धावा कुटल्या. तर महिला लोमरोरने ‘इम्पॅक्ट’ पाडत 8 चेंडूत 17 धावांची नाबाद छोटी पण महत्त्वाची खेळी केली.

News Title – rcb vs pbks ipl 2024 Virat Kohli becomes the first Indian to score 100 fifty plus scores in T20 cricket
महत्त्वाच्या बातम्या –

लेकीला उमेदवारी न दिल्यानं विजय वडेट्टीवर नाराज?

लग्नाला 13 वर्षे झाली, गुड न्यूज कधी देणार? प्रिया बापट म्हणाली…

‘त्यावेळी जातीचे रंग’; कुशल बद्रिकेची पोस्ट व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

“काळे झेंडे दाखवणाऱ्या मुलांवर गुन्हा….”; पंकजा मुंडेंची पोलिसांकडे मोठी मागणी

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .