“सच्च्या मराठ्यांनी जरांगेंना शिव्या…”; बारस्करांच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. जरांगेंनी सरकारकडे काही मागण्या देखील केल्या होत्या, सरकारने जरांगेंच्या मागण्या पूर्ण करत एक दिवसीय विशेष अधिवेशन घेतलं. शिवाय मराठा समाजाला 10 टक्के शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलं. मात्र, ओबीसीमधून जरांगेंना आरक्षण हवं आहे असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे जरांगे पुन्हा एकदा गावागावात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. दरम्यान, 24 मार्चला जरांगेंनी अंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत जरांगेंना सच्चा मराठ्यांनी शिव्या घातल्या असं बारस्कर म्हणाले.

काय आहे प्रकरण?

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणावरुण वातावरण तापलं आहे. असं असताना दुसरीकडे जरांगेंचे (Manoj Jarange) खास मित्र अजय बारस्कर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजय बारस्कर यांनी आज (26 मार्च) रोजी पत्रकार परिषद घेत जरांगेंवर टीका केली. या वेळी ते म्हणाले की, मला लोकांनी एक सल्ला दिला. ते म्हणाले की, महाराज काही दिवस तुम्ही शांत रहा. जरांगेंना कसं आंदोल करायचं आहे ते करु द्या.

आज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर विश्वास होता म्हणून त्यांना एवढा मोठा पाठिंबा मिळाला, मात्र अश्या काही घटना घडल्या ज्याने, समोर आल्या त्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे. पण आता जरांगे यांनी लोणावळ्यात बंद दाराआड चर्चा केली. आरक्षणाचा लढा हा राजकीय लढा झाला, असं ते म्हणाले.

जरांगेंना शिव्या घातल्या-

पुढे बारस्कर म्हणाले की, परवा अंतरवाली सराटी येथे पार पडलेल्या बैठकीला जे सच्चे मराठे गेले होते त्या लोकांनी जरांगे यांना शिव्या घातल्या आहेत. अशोक चव्हाण हे परवा रात्री तिकडे गेले, जरांगे यांना भेटले आणि माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. तुम्ही म्हणाला होतात सीएम, डीसीएम सोबत फेसटाईमवर चर्चा केली आणि त्यावेळी मोबाईलवर मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केलं. अशोक चव्हाण यांच्या भेटीवेळी काय चर्चा झाली त्याचं रेकॉर्डिंग जगासमोर आणा, असं बारसकर म्हणाले.

ज्यावेळेस जरांगेंनी उपोषण केलं होतं त्याचदिवशी आदल्या रात्री त्यांनी मटण खाल्लं आणि दुसऱ्यादिवशी वाशीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं, असा आरोपी त्यांनी केलाय.

News Title : manoj jarange accused by ajay maharaj baraskar

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! शिवाजी आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश

अजित पवार यांच्याकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा!

आज CSK विरुद्ध GT सामना रंगणार; अशी असेल संभाव्य प्लेयिंग 11

ठाकरे गटाच्या नेत्यांचा श्रीकांत शिंदेंविरोधात लढण्यास नकार?; आता ‘हे’ नावं चर्चेत

POCO C61 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स