अजित पवारांनी धनंजय मुंडेंना दिली सर्वांत मोठी जबाबदारी!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | आगामी लोकसभा निवडणुकांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महायुती पक्षातील भाजपने काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर काही जागेवरून शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप यांच्यात चर्चा सुरू आहे. अशातच आज (26 मार्च) अजित पवार गटाने आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे.

सुनिल तटकरे यांना रायगडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर 28 मार्चला संपूर्ण उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. काही काळ बारामतीचा सस्पेन्स ठेवतोय. बारामतीत तुमच्याच मनातील उमेदवार जाहीर केला जाईल, असं अजित पवार म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

धनंजय मुंडेंना मोठी जबाबदारी

महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक प्रमुख म्हणून धनंजय मुंडेंना जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवारांनी मुंडे यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. महायुतीमध्ये जागावाटपाबाबत 99 टक्के काम झालं आहे. येत्या 28 तारखेला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी असे तिघे मिळून पत्रकार परिषद घेऊन राहिलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करू, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

मागच्या वेळी जागावाटपात जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तेवढया मिळाव्यात असा आग्रह मित्रपक्षांचा होता. याबाबत सर्वांमध्ये विचारविनियम झाल्याचंही अजित पवार म्हणाले. तसंच बारामतीबाबत त्यांनी जरा मिश्किल प्रतिक्रिया दिली.

बारामतीबाबत पवारांचा सस्पेन्स

बारामतीचा उमेदवार कोण याबद्दल सस्पेन्स ठेवलाय पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव 99 टक्के असणार आहे, असं पवार म्हणाले. तसंच आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांचे समाधान होईल इतक्या जागा आम्ही मागितल्या आहेत आणि सातारा येथे काय निर्णय होईल, हे आम्ही 28 तारखेला सांगू. तोवर उदयनराजे यांना भाजपचे नेते समजून सांगतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

आज पुण्यात अजित पावर (Ajit Pawar) यांनी महत्वाची घेतली होती. यात बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. अजित पवारांनी आपला एक उमेदवार जाहीर केला आहे. आता 28 तारखेला कुणाला लोकसभेचं तिकीट मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

News Title : Ajit Pawar gave Dhananjay Munde the responsibility as Chief Election Officer in maharashtra

महत्त्वाच्या बातम्या-

आज ऋतुराज अन् शुभमन आमने सामने! कोण वरचढ ठरणार

‘त्या रात्री मनोज जरांगेंनी…’; वाशीतील सभेबाबत बारस्करांचा मोठा खुलासा!

जय श्रीराम घोषणा देणाऱ्या अल्पवयीन मुलाला मारहाण, अल्लाहू अकबरच्या घोषणा देण्यास पाडलं भाग

“अमोल कोल्हेंची बेडूक उडी…”, आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला

उन्हाळ्यात काकडी खाण्याचे आहेत इतके फायदे; ऐकून चकित व्हाल!