आज ऋतुराज अन् शुभमन आमने सामने! कोण वरचढ ठरणार

CSK Vs GT Pitch Report l आयपीएल 2024 चा सातवा सामना आज म्हणजेच मंगळवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यात शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड या दोन नव्या कर्णधारांच्या कर्णधारपदाची खरी कसोटी असणार आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. अशातच आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये चेन्नईविरुद्धच्या पराभवाचा बदला गुजरात संघाला घेण्याची संधी शुभमन गिलला आली आहे.

CSK Vs GT Pitch Report l चेन्नईतील पिच अहवाल कसा आहे? :

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी ही विकेटसाठी स्लो असते. चेपॉक नावाने ओळखल्या जाणाऱ्या या खेळपट्टीवर चेंडू अडकतो आणि त्यामुळे येथे फिरकीपटूंचे वर्चस्व असते. तसेच या मैदानावर फलंदाजांना धावा काढण्यासाठी फारच संघर्ष करावा लागतो. पण सेट झाल्यानंतर फलंदाज मोठी धावसंख्या काढतो.

चेपॉक मैदानावर प्रथम फलंदाजी करणारा संघ बहुतेक वेळा जिंकतो. आकडेवारी देखील दर्शवते की या मैदानावर आयपीएलमध्ये आतापर्यंत 77 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 46 वेळा विजय मिळवला आहे तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 31 वेळा विजय मिळवला आहे. या खेळपट्टीवर पहिल्या डावाची धावसंख्या 163 च्या आसपास आहे आणि दुसऱ्या डावाची धावसंख्या 150 च्या आसपास आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य शिलेदार :

चेन्नई सुपर किंग्ज प्लेयिंग 11 : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सनजेल, सिंजेकर सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अरावली अवनीश राव (यष्टीरक्षक).

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटल , मोहित शर्मा, अजमतुल्ला उमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर, बीआर शरथ.

News Title – CSK Vs GT Pitch Report

महत्त्वाच्या बातम्या

जय श्रीराम घोषणा देणाऱ्या अल्पवयीन मुलाला मारहाण, अल्लाहू अकबरच्या घोषणा देण्यास पाडलं भाग

“अमोल कोल्हेंची बेडूक उडी…”, आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना टोला

उन्हाळ्यात काकडी खाण्याचे आहेत इतके फायदे; ऐकून चकित व्हाल!

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर; 32 वर्षांनंतर प्रथमच होणार असं

उन्हाचा पारा वाढणार, राज्यात ‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता