उन्हाचा पारा वाढणार, राज्यात ‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update | राज्यात आता तापमानात वाढ होताना दिसत आहे. उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे सकाळीच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. राज्यातील वर्धा, सोलापूर, अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तपमानाची नोंद झाली आहे.

या भागांमध्ये पारा 40 शी पार गेला आहे. पुढील काही दिवस तापमानात अजूनच वाढ होण्याची शक्यता असून हवामान विभागाने 28 तारखेनंतर राज्यात वातावरण ढगाळ राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. तसंच काही ठिकाणी हलका पाऊसही पडू शकतो.

राज्यात तापमानात वाढ

यंदा मार्च आणि एप्रिल हा महिना सर्वाधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे. तापमान वाढीबरोबर राज्यात हलक्या पावसाची शक्यताही आयएमडीने व्यक्त केली आहे. साउथ इंटेरियर कर्नाटक ते विदर्भावर असलेली द्रोणीका रेषा किंवा हवेची विसंगती अजून कायम असल्याने उत्तर-पूर्व वारे गुजरातवरून जाऊन राज्यात कोकण व मध्य महाराष्ट्रात आद्रतेसोबत गरम हवा घेऊन येत आहे.

यामुळे तापमानात (Maharashtra Weather Update) प्रचंड वाढ होताना दिसत आहे. यामुळे महाराष्ट्रातील उत्तरी मध्य भागात 28, 29 आणि 30 मार्च दरम्यान आद्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. 28 तारखेनंतर राज्यातील काही भागांत पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता

सध्या सर्वाधिक तापमान (Maharashtra Weather Update) हे मालेगाव शहरात नोंदवलं गेलं आहे. येथे 40.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, यवतमाळचे तापमान 40 अंशापेक्षा जास्त होते. ब्रम्हपूरी, वर्धा, नागपूर, जळगाव शहरातील तापमानही 40 च्या आसपास पोहोचलं आहे.

पुण्यात तीन ते चार दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. मात्र, 28 मार्चला ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं. या दरम्यान एक ते दोन डिग्रीने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. 31 मार्चनंतर पुन्हा वतावरणात बदल होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

News Title : Maharashtra Weather Update

महत्वाच्या बातम्या-

लेकीला उमेदवारी न दिल्यानं विजय वडेट्टीवर नाराज?

लग्नाला 13 वर्षे झाली, गुड न्यूज कधी देणार? प्रिया बापट म्हणाली…

‘त्यावेळी जातीचे रंग’; कुशल बद्रिकेची पोस्ट व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोंमुळे चर्चांना उधाण

“काळे झेंडे दाखवणाऱ्या मुलांवर गुन्हा….”; पंकजा मुंडेंची पोलिसांकडे मोठी मागणी