बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर; 32 वर्षांनंतर प्रथमच होणार असं

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs AUS | भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Test Series) यांच्यात होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. (BGT Schedule) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याची माहिती दिली असून यावेळी चार सामन्यांची नसून पाच सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने सोमवारी याबाबत माहिती दिली होती. आगामी काळात क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा अर्थात ट्वेंटी-20 (T20 World Cup 2024) विश्वचषक होणार आहे. जूनमध्ये अमिरेका आणि वेस्ट इंडिजमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सप्टेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 1991-92 नंतर प्रथमच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची मालिका होणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ही मालिका दोन्हीही संघांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असते. भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजयाची हॅटट्रिक मारण्याची संधी असणार आहे.

BGT मालिकेचे वेळापत्रक

वर्षांच्या अखेरीस या मालिकेला सुरुवात होणार असून 2025 च्या पहिल्या महिन्यातील पहिल्या आठवड्यात मालिका संपेल. ऑस्ट्रेलियाचा पुरूष आणि महिलांचा संघ सप्टेंबर ते फेब्रुवारीदरम्यान, सहा कसोटी, 9 वन डे आणि 9 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. 12 विविध ठिकाणांवर हे सामने खेळवले जातील.

पहिला कसोटी सामना – 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरा कसोटी सामना – 6 ते 10 डिसेंबर, एडिलेड
तिसरा कसोटी सामना – 14 ते 18 डिसेंबर, गॅबा
चौथा कसोटी सामना – 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवा कसोटी सामना – 3 जानेवारी ते 7 जानेवारी, सिडनी

 

IND vs AUS नोव्हेंबरपासून थरार

पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन संघ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारतीय संघाशी दोन हात करेल. 22 नोव्हेंबर 2024 पासून या मालिकेला सुरुवात होत आहे. खरं तर ऑस्ट्रेलियाने आपल्या मायदेशात 2014-15 पासून एकाही मालिकेत भारताला पराभूत केले नाही. मागील वेळी रिषभ पंतच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर भारताने गॅबा कसोटी जिंकली होती.

दरम्यान, 2004 पासून ऑस्ट्रेलियाने भारताच्या धरतीवर एकही कसोटी मालिका जिंकली नाही. आगामी मालिकेबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांनी सांगितले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्यांकडे अवघ्या जगाचे लक्ष लागते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची मालिका कोण जिंकते याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष असते.

News Title- IND vs AUS border Gavaskar trophy schedule announced for the first time since 1992 there will be five matches
महत्त्वाच्या बातम्या –

उन्हाचा पारा वाढणार, राज्यात ‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता

कंगनावर अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट, काँग्रेस नेत्या अडचणीत; नेमकं प्रकरण काय?

यंदाच्या वर्षी ‘या’ तारखेपासून सुरु होणार चैत्र नवरात्री; जाणून घ्या शुभ मुहूर्त

तुमच्या वाहनाचा क्रमांक म्हणजे तुमची ओळख! अशाप्रकारे मिळवा VIP वाहन क्रमांक

2 मुलींनी हद्दच केली! होळीचा सण पडला लय ‘भारी’, पोलिसांची मोठी कारवाई, Video