यंदाच्या वर्षी ‘या’ तारखेपासून सुरु होणार चैत्र नवरात्री; जाणून घ्या शुभ मुहूर्त

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chaitra Navratri 2024 l धार्मिक ग्रंथानुसार, नवरात्रीचे नऊ दिवस माता दुर्गा भक्तांमध्ये पृथ्वीवर वास्तव्य करते. चैत्र मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. यावर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात 9 एप्रिल 2024 पासून होणार आहे तर ती रामनवमीला संपणार आहे. यंदाच्या वर्षी देवीचे वाहन हे घोडा असणार आहे. तर मग आज आपण जाणून घेऊयात देवीच्या या वाहनाचा संकेत काय आहे?

Chaitra Navratri 2024 l चैत्र नवरात्री 2024 घटस्थापना मुहूर्त :

पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 8 एप्रिल 2024 रोजी रात्री 11:50 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल 2024 रोजी रात्री 08:30 वाजता समाप्त होणार आहे.

चैत्र नवरात्र कधी आहे? :

यंदाच्या वर्षी चैत्र नवरात्रीची सुरुवात ही 9 एप्रिल 2024 रोजी होणार आहे तर 17 एप्रिल 2024 रोजी संपणार आहे. त्यामुळे यावर्षी चैत्र नवरात्री पूर्ण म्हणजेच 9 दिवस साजरी होणार आहे. यावर्षी कोणत्याही तिथीचा क्षय झालेला नाही. शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये तिथी येणे अशुभ मानले जाते.

चैत्र नवरात्रीत देवीचे वाहन काय असणार? :

चैत्र नवरात्रीत देवीचे वाहन शुभ आणि अशुभ परिणामांचे सूचक मानले जाते. त्याचा निसर्गावर आणि मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. यावेळी चैत्र नवरात्रीमध्ये माँ दुर्गेचे घोड्यावर आगमन होणार आहे. घोडा हे माँ दुर्गेचे शुभ वाहन मानले जात नाही, ते युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती दर्शवते. त्यामुळे यंदाचे वर्ष हे युद्धाचे आणि नैसर्गिक आपत्तीचे असणार आहे.

Chaitra Navratri 2024 l चैत्र नवरात्री 2024 तारखा पुढीलप्रमाणे :

पहिला दिवस – 9 एप्रिल २०२४ (प्रतिपदा तिथी, घटस्थापना): माँ शैलपुत्री पूजा
दुसरा दिवस – 10 एप्रिल 2024 (द्वितिया तिथी): माँ ब्रह्मचारिणी पूजा.
तिसरा दिवस – 11 एप्रिल 2024 (तृतिया तिथी): माँ चंद्रघंटा पूजा
चौथा दिवस – 12 एप्रिल 2024 (चतुर्थी तिथी): माँ कुष्मांडा पूजा
पाचवा दिवस – 13 एप्रिल 2024 (पंचमी तिथी): माँ स्कंदमाता पूजा
सहावा दिवस – 14 एप्रिल 2024 (षष्ठी तिथी): माँ कात्यायनी पूजा
सातवा दिवस – 15 एप्रिल २०२४ (सप्तमी तिथी): माँ कालरात्री पूजा
आठवा दिवस – 16 एप्रिल 2024 (अष्टमी तिथी): माँ महागौरी पूजा
नववा दिवस – 17 एप्रिल 2024 (नवमी तिथी): माँ सिद्धिदात्री पूजा, राम नवमी

News Title : Chaitra Navratri 2024

महत्त्वाच्या बातम्या- 

तुमच्या वाहनाचा क्रमांक म्हणजे तुमची ओळख! अशाप्रकारे मिळवा VIP वाहन क्रमांक

2 मुलींनी हद्दच केली! होळीचा सण पडला लय ‘भारी’, पोलिसांची मोठी कारवाई, Video

अजित पवार यांच्या डोकेदुखीत वाढ; पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य विरोधात

सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; 1 एप्रिलपासून होणार मोठे बदल

वाचनीय: CSK त ऋतु’राज’! मुंबईत ‘हार्दिक’ स्वागत; पण पांड्या ‘लक्ष्य’ का?